Hair Care Tips for Winter : हिवाळ्यामध्ये त्वचेची आणि केसांची (Skin and Hair Care) विशेष काळजी घेतली पाहिजे. थंडीत हवेमुळे केस कोरडे होतात. प्रदुषण आणि केसांची निगा न राखणे या कारणांमुळे केस गळतीला सामोरे जावे लागते. जर तुम्हाला काळेभोर आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही या तेलाचा वापर केला पाहिजे.
केसांना लावा ऑलिव्ह ऑइल
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, ऑलेइक एसिड अशी पोषक तत्वे असतात. ऑलिव्ह ऑइल केसांना लावल्यानं केस कमी गळतात. तसेच केसांची ग्रोथ चांगली होते. आठवड्यातून तीन वेळा केसांना ऑलिव्ह ऑइल लावल्यानं तुमचे केस सिल्की होतील.
तिळाचे तेल
केसांना तिळाचे तेल लाऊन मालिश केल्यानं डोक्याच्या भागात ब्लड सर्कुलेशन चांगले होते. तसेच थंडीमध्ये केसांना तिळाचे तेल लावल्यानं केसांचा कोरडेपणा निघून जातो.
बदाम तेल
या तेलामध्ये प्रोटीन, विटामिन ई आणि मॅग्नीशियम असते. ज्यामुळे केस मजबूत होतात. बदामाचं तेल केसांना गरम करून लावल्यानं केस चमकदार होतात.
थंडीमध्ये केससारखे धुवू नका. सारखे केस धुतल्याने केसांमधील नॅचरल ऑइल (Natural Oil) निघून जाते. त्यामुळे केस कोरडे होतात. केस अठवड्यातून दोन वेळाच धुवावेत. केस धुताना कंडिश्नरचा वापर करा. त्यामुळे केस मॉयश्चराइझ होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha