Health Tips : फिटनेस हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढव्यासाठी योग्य व्यायाम हा देखील एक महत्त्वाचा भाग होता. एखाद्याला वजन कमी करायचे असेल तर जास्त प्रमाणात जिम केली जाते. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि शरीराला टोन करण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांनी फिटनेसवर भरपूर लक्ष केंद्रित केले आहे. वॉर्म अप हा वर्कआउट रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे. NHS Inform नुसार, वॉर्म अप केल्याने एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची गती वाढते, ज्यामुळे स्नायूंपर्यंत अधिक ऑक्सिजन पोहोचतो. व्यायाम करण्यापूर्वी स्वतःला उबदार करणे खूप महत्वाचे आहे. वेटलिफ्टिंग सुरू केल्याने स्नायूंचा ताण आणि दुखापतीचा धोका वाढू शकतो.


खूप लवकर वजन उचलणे


अनेकांना वर्क आऊट करताना खूप हेव्ही वजन उचलण्याची ज्याला हेव्ही वेटलिफ्टींग म्हणतात याची सवय असते. यामुळे तुम्हाला काही काळ बरं वाटते. पण, त्यानंतर तुमचे सांधे, बोर्न्स, मसल्स दुखू लागतात. त्यामुळे हे तुमच्यासाठी फार घातक ठरू शकते. जर तुम्ही पटकन वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे करत आहात.


जास्त व्यायाम करणे


शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करणे आवश्यक आहे. आपले स्नायू मजबूत करण्याचा आणि टोन्ड बॉडी तयार करण्याचा वेटलिफ्टिंग हा एक उत्तम मार्ग आहे. परंतु उत्तम रिझल्ट्स मिळविण्यासाठी जर तुम्ही तुमच्या शरीरावर जास्त वजन लादत असाल किंवा जास्त काम करत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. कितीही वेळ लागला तरी चालेल, पण जास्त व्यायामाकडे स्वत:ला ढकलू नका, त्यामुळे दुखापत होऊ शकते. तुम्ही कार्डिओ, बॉडीवेट ट्रेनिंग किंवा वेटलिफ्टिंगमध्ये असाल, व्यायाम करणे आवश्यक आहे. याशिवाय, आपण कालांतराने ट्रॅक गमावू शकता.


त्यामुळे जिम करत असताना या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमच्या शरीरावर जास्त ताण येणार नाही. सुरुवातीला कमी वजनाने व्हेट लिफ्टींग करा. तसेच, शरीराच्या क्षमतेनुसार व्यायाम करणं गरजेचं आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा