बहिणीला रक्षाबंधानानिमित्त द्या हे खास गिफ्ट
स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते, ही अनेकांची समस्या असते. त्यामुळे तुमच्या बहिणीच्या स्मार्टफोनची बॅटरी सेव्ह व्हावी, यासाठी पॉवर बँकही एक उत्तम पर्याय आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्वेलरी हा स्त्री वर्गाचा सर्वात आवडता प्रकार आहे. त्यातच स्मार्ट ज्वेलरी हा एक नवीन प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहे. स्मार्ट ज्वेलरी हे ब्लूट्यूथच्या कनेक्टिव्हीटीसोबतही उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून तुमची बहीण संकट काळात संपर्क साधू शकते. विशेष म्हणजे, हे जास्त महागही नाहीत.
अनेक मुलींना पुस्तक वाचनाची आवड असते. पण मोठमोठी पुस्तके सोबत घेऊन फिरणे शक्य नसते. अशावेळी किंडल हाही तुम्हाला एक चांगला पर्याय आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट अमेझॉनवर 6 हजारांपासून 25 हजारांपर्यंत किंडल मिळू शकतात.
तुम्ही तुमच्या बहिणीला ब्लूटूथ स्पिकर गिफ्ट देऊ शकता
मुलींसाठी फिटनेस अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फिटनेस बॅण्ड आवश्यकच आहे. त्यामुळे तुम्ही रक्षाबंधनानिमित्त बहिणीला फिटनेस बॅण्डही गिफ्ट करू शकता.
रक्षाबंधानिमित्त तुम्ही तुमच्या बहिणीला डिजिटल कॅमेराही गिफ्ट करू शकता. सध्या बाजारात पॅनेसोनिक, निकॉन, सोनी, सॅमसंग आणि कॅननचे उत्तम दर्जाचे डिजिटल कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत.
सध्याच्या युगात टॅबलेट हा गिफ्टचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. याच्या माध्यमातून तुम्ही चित्रपटांसोबत गाणी ऐकण्याचाही आनंद घेऊ शकता. एखादा चांगला टॅबलेट बाजारात दहा ते वीस हजारांत सहज उपलब्ध होऊ शकतो. यामध्ये आयपॅड शिवाय लिनोव्हो आणि शाओमीचे लेटेस्ट व्हर्जनही आहेत.
तुमच्या बहिणीला संगीताची विशेष आवड असेल, तर तुम्ही तिला हेडफोनही देऊ शकता. सध्या बाजारात तुम्हाला तुमच्या बजेटमधील विविध कंपनींचे हेडफोन मिळतील.
स्मार्टफोन तर आज काळाची गरज आहे. आज कोणत्याही व्यक्तीकडे स्मार्टफोन सहज पाहायला मिळतो. त्यामुळे हे देखील तुमच्या बहिणीला आवडणारे गिफ्ट आहे. शाओमीचा रेडमी सध्या बाजारात सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन आहे. याशिवाय आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी, कुलपॅड, एचटीसी आदीचे स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
या गिफ्टच्या यादीत पहिला क्रमांक आहे स्मार्टवॉच. जर तुमच्या बहिणीला स्मार्टफोन किंवा गॅजेटची आवड असेल, तर तुम्ही तिला स्मार्टवॉच देऊन तिचे मन जिंकू शकता. या स्मार्टवॉचमधील पेबलचे स्मार्टवॉच सध्या अनेक फिचर्सने उपलब्ध आहे. जर तुम्ही बहिणीला गिफ्ट देण्यासाठी खर्चाची काळजी करत नसाल, तर अॅपलचं स्मार्टवॉच त्यासाठी योग्य पर्याय आहे.
प्रत्येक भावाला रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यावे? याची चिंता असते. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही गिफ्टची माहिती देत आहोत, ज्यामुळे तुमची बहीण नक्की खुश होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -