Friendship Day 2022 : मैत्री (Friendship) हे असं निखळ नातं आहे जे तुम्ही ठरवून तयार करता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमचे मित्र मैत्रीण निवडता. त्यांंच्याशी सुख-दु:ख मांडता. अनेक गोष्टी शेअर करता. हे नातं असं आहे ज्यामध्ये तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही. किंवा हवा तेवढा वेळ तुम्ही घालवू शकता. मात्र, तुमची मैत्री कितीही घट्ट असली तरी काही गोष्टी आहेत ज्या मैत्रीमध्ये बोलल्या तर त्याचा तुमच्या मैत्रीवर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक नात्याप्रमाणे या नात्यातही काही गोष्टी अशा असतात, ज्या तुमच्या मित्रासमोर टाळल्या पाहिजेत. भारतात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशीप डे' साजरा केला जातो. याच निमित्ताने जाणून घ्या मैत्रीतील काही सिक्रेट गोष्टी...


व्यक्तिमत्त्वावर बोलू नका : 


तुमचे वजन कमी झाले पाहिजे. 'तू खूप हाडकुळा आहेस.' 'तुझी उंची इतकी कमी का आहे?' 'तुझा चेहरा मोठा आहे.' जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला मित्र मानत असाल तर त्याच्या व्यंगावरून असे काहीही बोलू नका ज्याने ते दुखावतील. यापैक्षा सौम्य भाषेत त्यांना समजावून सांगितल्यास ते तुमचा सल्ला नक्की ऐकतील.     


कमी लेखू नका : 


नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मित्र-मैत्रीणीला कधीच कोणासमोर कमी लेखू नका. किंवा त्यालाही हे बोलून दाखवू नका. यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होईल. तुम्हाला त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवायचा आहे. खरा मित्र तोच असतो जो त्याच्या वाऊटातही साथ सोडत नाही. त्याच्या दुर्गुणांचा स्विकार करतो. त्याला हिणवत नाही किंवा कमी लेखत नाही. 


रडण्यावरून बोलू नका : 


काही मित्र-मैत्रीण असे असतात की ते सुखात किंवा दुखात कायम रडत असतात. अशा वेळी तुम्हाला तुमच्या मित्राची चिड येऊ शकते. किंवा तुम्ही त्याला रागाने बोलाल तर त्याला किंवा तिला राग येऊ शकतो. आणि या छोट्या गोष्टीमुळे ती तुमच्यापासून कायमची दुरावू शकते. त्यामुळे तुमच्या मित्र-मैत्रीणींवर कधीच रागावू नका. तर काही गोष्टी त्यांना प्रेमाने समजावून सांगा. 


मैत्रीचं नातं हे खूप खास असतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा अधिक खास करण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्यावरून आपला मित्र दुखावला जाणार नाही ना याची खात्री करा आणि मैत्री जपा. 


महत्वाच्या बातम्या :