Food : आजकाल प्रत्येकजण चांगले शिक्षण आणि नोकरी मिळावी म्हणून मेट्रो सिटीत येत आहे. आपले चांगले करिअर घडवण्याच्या प्रयत्नात कुटुंब, घर सोडून त्यांना दुसऱ्या शहरात राहावे लागत आहे.  आजच्या मुलांचे वसतिगृह आणि पीजीमध्ये राहणे स्वाभाविक आहे. नोकरी आणि अभ्यासासाठी ही मुलं दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे आणि बंगळुरूसह अनेक मोठ्या शहरांमध्ये जातात. घरापासून दूर, लोक अनेकदा हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहणे निवडतात. पीजी आणि हॉस्टेलमध्ये राहण्यासोबतच दोन वेळचे जेवणही मिळते. हॉस्टेल आणि पीजी फूड हे असे आहे की तुम्ही काही महिने ते खाऊ शकता, परंतु काही महिन्यांनंतर तुम्हाला घरच्या जेवणाची आठवण येते, आणि मग कधी कधी हॉस्टेलच्या त्या जेवणाने पोट भरत नाही, अशावेळी रात्री खूप भूक लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला रात्री उशिरा भूक लागली असेल तर तुम्हाला या हॉस्टेल कुकिंग हॅक्सबद्दल माहित असायलाच पाहिजे.. जाणून घ्या...



सँडविच बनवा.. पण इस्त्रीच्या मदतीने?


हॉस्टेल मध्ये राहणाऱ्यांकडे कपडे प्रेस करण्यासाठी लोखंडी इस्त्री नक्कीच असते. तुम्ही ते ब्रेड टोस्ट करण्यासाठी किंवा सँडविच बनवण्यासाठी वापरू शकता. सँडविच बनवल्यानंतर ब्रेडला ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळा आणि गरम करण्यासाठी इस्त्रीखाली ठेवा. दोन्ही बाजूंनी शिजवा आणि नंतर गरम सँडविचचा आनंद घ्या.



रिकाम्या बाटलीत कॉफी बनवा


कोल्ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्यांच्या मदतीने तुम्ही कोल्ड कॉफी बनवू शकता. बाटलीत कॉफी, साखर आणि दूध घालून चांगले हलवून घ्या. सर्व काही मिक्स झाले  की त्यात दूध आणि बर्फाचे तुकडे मिसळा आणि सर्व्ह करा.


 


पाण्याच्या किटलीत नूडल्स बनवा


पाण्याची किटली नक्कीच पाणी गरम करण्यासाठी आहे, तुम्ही ती फक्त पाणी किंवा दूध गरम करण्यासाठी वापरू शकता असे नाही, तर तुम्ही झटपट नूडल्स, ओट्स आणि भातासह इतर जेवण देखील बनवू शकता.


 


हेअर ड्रायरने चीज वितळवा


मुलींच्या मेकअप ॲक्सेसरीजमध्ये हेअर ड्रायर नसणे अशक्य आहे. हेअर ड्रायरने तुम्ही तुमचे फक्त केस आणि कपडेच सुकवू शकत नाही, तर सँडविच किंवा पराठ्यावर चीज टाकून ते ड्रायरने वितळवू शकता.


 


कुरकुरेमध्ये सॅलड मिसळून चाट बनवा.


जर रात्रीचे 12 वाजले असतील आणि तुम्हाला काहीतरी चटपटीत खावेसे वाटत असेल तर चिप्स किंवा कुरकुरेचे पॅकेट फोडून टाका. आता टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कांदा आणि काकडी बारीक चिरून पॅकेटमध्ये घाला. वर मीठ, लिंबू आणि चाट मसाला घाला, सर्वकाही मिक्स करा आणि मसालेदार चाट मिक्सचा आनंद घ्या.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health : काय सांगता! 'ही' भाजी मटण-मच्छी पेक्षाही भारी? आरोग्यासाठी फायदेशीर, चवीची गोष्टच न्यारी! जाणून थक्क व्हाल..