Food inflation : देशात अन्नधान्य महागाई (Food inflation) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. देशात अन्नधान्य महागाईचा दर हा 5 टक्के आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर हा 8 टक्क्यांच्या वर आहे. दरम्यान, ही वाढती महागाई कमी कधी होणार? याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरणं दिलं आहे. महागाईच्या संदर्भात आरबीआयने नेमकं काय म्हटलंय? त्या संदर्भातील माहिती पाहुयात. 


अन्नपदार्थांच्या किंमतीत झालेली वाढ होणार


सध्या भारतात अन्नधान्य महागाई दर वाढत आहे. भविष्यात ही समस्या कमी होणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. कारण देशामध्ये पुरवठा साखळी विकसीत होईल. अन्न पुरवठ्याचे वेगवेगळे स्त्रोत उपलब्ध होतील. त्यामुळं अन्नपदार्थांच्या किंमतीत झालेली वाढ कमी होईल. देशातील सामान्य लोकांच्या बऱ्यापैकी पैसा हा अन्नपदार्थावर म्हणजे खाण्यावर खर्च होतो. अन्नपदार्थाच्या किंमती कमी होण्यासाठी उत्पादकता वाढवण्याची गरज आहे. उत्पादकता वाढल्यामुळं महागाईचा दर आपोआप कमी होणार आहे. 


आपण कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढल्या महागाई कमी होण्यास मदत 


आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत जसाजसा विकसीत होईल तस तश्या समस्या कमी होतील. महागाईचा दर कमी होण्यास मदत होईल असं आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देशात नैसर्गिकरित्या वैविध्यपूर्ण भौगोलिक वातावरण आहे. जगातील अनेक भागांपैक्षा चांगले हवामान आहे. यामुळं आपण कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवून महागाई कमी करु शकतो अशी माहिती आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. दरम्यान, मार्च 2024 मध्ये किरकोळ महागाईचा दर हा 4.85 टक्क्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, एप्रिल महिन्यात महागाई दरात वाढ झाली आहे. 


हवामानातील बदल आणि जागतिक तणावामुळं महागाईत वाढ


हवामानातील बदल आणि जागतिक तणावामुळं महागाईत वाढ होत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला इराण इस्त्राईल यांच्यातील युद्धाचा तणाव आहे. त्यामुळं महागाई वाढत आहे. चालू तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च महिन्यात किरकोळ महागाईत घट झाली होती. मात्र, एप्रिल महिन्यात काही प्रमाणात महागाई वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, या अन्नधान्याच्या महागाईबरोबरच कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. या महागाईचा मोठा फटका नागरिकांना बसू शकतो. दरम्यान, येणाऱ्या काळात महागाईचा दर कमी होण्याची शक्यता आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. उत्पादकता वाढवली की, महागाई दर होईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?