Food : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना लठ्ठपणाने ग्रासलंय. निरोगी राहण्यासाठी वजन कमी करणे ही काळाची गरज बनलीय. कामाचा ताण आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे काही लोकांना व्यायाम किंवा डाएट फूड खाणं वैगेरे या गोष्टी जमत नाही, ज्यामुळे वजन वाढतंच चाललंय. तसं पाहायला गेलं तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी बरेच लोक अचानक खाणं-पिणं बंद करतात. तर काही लोक आपल्या आवडत्या अन्नापासून दूर राहतात. वजन नियंत्रणात आणण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जातात. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, तर आम्ही तुम्हाला एका अतिशय हेल्दी आणि टेस्टी रेसिपीची माहिती देत ​​आहोत, ज्यामुळे तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास अधिक सोपा होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञ बिन्नी चौधरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर यासंबंधीची माहिती शेअर केली आहे. जाणून घेऊया ही रेसिपी कशी तयार केली जाते आणि वजन कमी करण्यात कशी मदत होते.


मखाणा डोसा बनवण्यासाठी साहित्य


1 कप मखाणा
अर्धा कप रवा
अर्धा कप पोहे
अर्धा कप दही
चवीनुसार मीठ
पाणी गरजेनुसार


 


 




 


मखाणा डोसा बनविण्याची पद्धत


मखाणा आणि पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
आता त्यात रवा, दही आणि मीठ टाका.
त्यात पाणी घालून छान पीठ तयार करा.
आता गॅसवर नॉन-स्टिक पॅन ठेवा.
त्यावर अर्धा चमचा तूप घालून पीठ पसरावे.
एक बाजू शिजली की उलटे करून दुसरी बाजू शिजवा.
तुमचा मखाणा डोसा तयार आहे, नारळाची चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत त्याचा आस्वाद घ्या.


मखाणा डोसाचे फायदे


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा डोसा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व घटक प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात, याचा अर्थ असा आहे की यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटू शकते आणि तुम्ही अतिरिक्त खाणे देखील टाळू शकता. त्याच वेळी, त्यात कॅलरीजचे प्रमाण देखील खूप कमी आहे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पचन सुधारू शकते, पचन सुधारून, चयापचय जलद होते आणि तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता.


 


हेही वाचा>>>


Food :  पावसाळ्यात हेल्दी अन् लाईट स्नॅक्सचा आस्वाद घ्यायचाय? पालकापासून बनवलेले 'स्टीम्ड स्पिनच नगेट्स' Best!


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )