Food : चैत्र नवरात्रीला (Chaitra Navratri 2024)  सुरूवात झालीय. नवरात्री निमित्त अनेकजण उपवास करतात. पण अनेकदा असं होतं, नेमकं उपवासाच्याच दिवशी बऱ्याच लोकांना सारखी भूक लागते. अशावेळी विविध पदार्थ खायचं मन होतं. अनेक पदार्थ आपल्याकडून खाल्लेही जातात. अशावेळी नेमकं काय करायचं ते सुचत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहोत. जे खाल्यानंतर उपवासा दरम्यान वारंवार भूक लागणार नाही. जाणून घ्या...


दोन प्रकारच्या पराठ्याच्या रेसिपी पाहा..


नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर, देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक नऊ दिवस कठोर उपवास करतात. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार, भक्ती आणि शक्तीनुसार उपवास करतो. फक्त पाणी पिऊन हे नवरात्रीचे व्रत करणारे अनेक लोक आहेत. उपवासात एकाच वेळी अन्न किंवा फळे खातात असे भक्तही आहेत. उपवासाच्या काळात उपवास करणाऱ्यांसाठी त्यांच्या घरी दररोज विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ आणि अन्न तयार केले जाते. आज आम्ही तुमच्यासोबत खास आणि खास अशा दोन प्रकारच्या पराठ्याच्या रेसिपी शेअर करणार आहोत. पराठ्याची ही रेसिपी बनवायला खूप सोपी आणि खायला खूप चविष्ट आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याची पद्धत.



राजगिरा पराठा रेसिपी


या वेळी उपवासाच्या वेळी शिंगाडा आणि साबुदाण्याऐवजी, राजगिरा वापरून बनवलेला हा स्वादिष्ट पराठा एकदा ट्राय करून पाहा..


साहित्य -


पनीर 100 ग्रॅम
उकडलेले बटाटे 2 मध्यम
बारीक चिरलेली कोथिंबीर 1/1कप
बारीक चिरलेली मिरची 2
किसलेले आले
चवीनुसार मीठ
जिरा पावडर 1 टीस्पून
लाल मिरची पावडर 1 टीस्पून
ठेचलेले शेंगदाणे (भाजलेले) 1/4 कप
राजगिरा 1 आणि 1/2 कप
देशी तूप 2 चमचे


राजगिरा पराठा कसा बनवायचा?


एक मोठी कढई घ्या आणि त्यात वर नमूद केलेले सर्व साहित्य घाला आणि मिक्स करा.
सर्व पदार्थांच्या मदतीने मऊ पीठ मळून घ्या
पीठ तयार झाल्यावर छोटे गोळे घेऊन तळहाताच्या साहाय्याने गोल करा.
आता पीठ दाबून लाटण्याच्या मदतीने लाटून घ्या आणि पराठा बनवा.
पराठा तव्यावर ठेवून शिजवून घ्या आणि दोन्ही बाजूंनी तूप लावा.
सोनेरी झाल्यावर ताटात काढून दही व चटणीसोबत सर्व्ह करा.


टिप्स


पराठ्यासाठी पीठ मळताना त्यात एक ते दोन चमचे दही टाका, त्यामुळे मऊ पीठ तयार होईल.


  
नाचणी पनीर बटाटा पराठा रेसिपी


साहित्य


2 कप नाचणीचे पीठ
चवीनुसार खडे मीठ
1 टेबलस्पून तेल
2 उकडलेले बटाटे
2 चमचे किसलेले चीज
1 टीस्पून आले बारीक चिरून
1/2 टीस्पून चिली फ्लेक्स
3 चमचे चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर
1 चमचा तूप


पराठा कसा बनवायचा?



नाचणी पनीर बटाटा पराठा बनवण्यासाठी एका भांड्यात बटाटे, खडे मीठ, किसलेले चीज, कोथिंबीर, मिरची आणि मिरचीचे फ्लेक्स घालून चांगले मिक्स करा.
आता एका भांड्यात नाचणीचे पीठ घेऊन त्यात दोन चमचे तूप घालून मऊ पीठ मळून घ्या.
पिठाचे छोटे गोळे करून त्यात बटाटा-चीजचे मिश्रण भरून पराठा लाटून घ्या.
तवा गॅसवर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी तूप लावून पराठा शिजवा.
पराठा चांगला शिजला की दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Food : उपवास असताना सर्वांनाच पडणारा प्रश्न! काय खावं? काय खाऊ नये? इथे मिळेल उत्तर