Food : दूध, दही, चीज आणि ताक असे दुग्धजन्य पदार्थ कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का? या पदार्थांचे अतिसेवन करणं आरोग्यासाठी किती चांगलं आहे? विशेषत: हृदयाचे विकार असणाऱ्या लोकांसाठी हे पदार्थ कितपत योग्य आहे? जाणून घ्या


 


दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करताना सावधान!


दूध, दही, चीज आणि ताक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. दुग्धजन्य पदार्थ संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग मानला जातो. हे पदार्थ कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. जे मुलांच्या विकासासाठी आणि वृद्धांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. परंतु जेव्हा हृदयरोग्यांचा विचार केला जातो. तेव्हा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन सावधगिरीने केले पाहिजे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. ज्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हृदयविकारांना आमंत्रण मिळते.


 


शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते


दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन डी यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा भरपूर प्रमाणात समावेश असतो, परंतु त्यांच्या जास्त सेवनाने हृदयविकार होऊ शकतो. विशेषत: ज्यांना आधीच हृदयविकार आहे. त्यांच्या बाबतीत, पूर्ण चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतात. संशोधनानुसार, दररोज 200 ग्रॅम पर्यंत दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे सोडू नयेत, कारण त्यामध्ये शरीर आणि मनाला लाभदायक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे कमी चरबीयुक्त दूध, दही आणि चीज यांचे सेवन करावे. फुल फॅट दूध, मलई, चीज नेहमी कमी प्रमाणात सेवन करावे.


 


हृदयरोग्यांसाठी पर्याय काय आहेत?


हृदयाच्या रुग्णांनी चरबी कमी असलेल्या पर्यायांना प्राधान्य देणे महत्वाचे आहे. कारण हे घटक हृदय तसेच रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटक वाढवू शकतात.


 


कमी फॅट किंवा स्किम्ड दूध


सर्वोत्तम पर्यायांमध्ये कमी चरबीयुक्त दूध आणि स्किम दूध यांचा समावेश होतो, ज्यात सॅच्युरेटेड फॅट कमी असते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात.


 


सॅच्युरेटेड फॅटमुक्त दही


त्याचप्रमाणे सॅच्युरेटेड फॅटमुक्त दही, विशेषतः साखर नसलेले साधे दही, चरबी आणि कॅलरीज टाळण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.


 


कमी फॅट पनीर


कॉटेज चीज सारख्या कमी चरबीयुक्त चीजद्वारे शरीराला पोषण देखील मिळते, चीजमध्ये कॅलरीज असतात, म्हणून ते मर्यादित प्रमाणातच सेवन केले पाहिजे.


 


दही


सामान्य दहीच्या तुलनेत, ग्रीक दह्यामध्ये प्रथिने जास्त आणि कर्बोदकांमधे कमी असते. ज्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.


 


हृदयाच्या रुग्णांसाठी कोणती डेअरी उत्पादन वाईट असतात? 


 


पूर्ण फॅट दूध


हृदयाच्या रुग्णांनी पूर्ण फॅट असलेले दूध आणि दही टाळावे. कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयविकाराची समस्या आणखी वाढू शकते.


 


चीज


सॅच्युरेटेड फॅटयुक्त क्रीम चीज कमी प्रमाणात खावे, तर चेडर किंवा स्विससारख्या हार्ड चीजमध्येही भरपूर फॅट असते, त्यामुळे हृदयाच्या रुग्णांनी ते टाळावे.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Skin Care : चेहऱ्याची जादू ठेवा कायम! कुठे सावळा, तर कुठे गोरा दिसतोय? त्वचेचा पोत सुधारण्यासाठी 'या' गोष्टी लावा.