Fitness Tips : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येक वयोगटातील लोक व्यायाम (Excercise) करतात. पण वयानुसार व्यायाम करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमची छोटीशी चूकदेखील तुमच्या आरोग्याला (Health) हानी पोहोचवू शकते.
आजकाल लोक स्वतःला फिट ठेवण्यासाठी योगा आणि व्यायाम करतात. यामुळे केवळ फॅट कमी होत नाही तर तणावातूनही आराम मिळू शकतो. तसेच, शरीरासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. व्यायाम कोणत्याही वयात सुरू करता येतो, त्यामुळे माणसाला अनेक आजारांपासून वाचवता येते. डॉक्टर देखील दररोज व्यायाम करण्याचा सल्ला देतात.
पण, आपल्या सर्वांना माहित आहे की, वाढत्या वयाचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. अशा स्थितीत व्यक्तीच्या शरीराची क्षमता कमी होऊ लागते. विशेषत: वयाच्या तिशीनंतर स्नायूंची लवचिकता आणि ताकद कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत या वयात व्यायाम करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जास्त व्यायाम करणे
वयाच्या तिशीनंतर, शरीराची लवचिकता कमी होते. त्यामुळे जास्त व्यायाम केल्याने दुखापत होऊ शकते. यासाठी आठवड्यातून 3 ते 4 दिवस व्यायाम करणं गरजेचं आहे. प्रत्येक वर्कआउटची मर्यादा 45 मिनिटे असली तरी ते तुमच्यासाठी चांगले असेल.
वॉर्म अप न करणे
व्यायाम करण्यापूर्वी बॉडीला वॉर्म अप करण्यास विसरू नका. हे तुमच्या स्नायूंना आराम देते आणि कोणत्याही प्रकारच्या दुखापतीपासून तुमचे रक्षण करते.
चुकीचा व्यायाम करणे
चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने दुखापतीचा धोका वाढतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच व्यायाम करा आणि योग्य व्यायाम करा.
डिहायड्रेशनची काळजी न घेणे
व्यायाम करताना शरीराला घाम येतो, त्यामुळे डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे व्यायामापूर्वी, दरम्यान आणि नंतर पाणी प्यावे हे लक्षात ठेवा.
जास्त कठीण व्यायाम करणे
वयाच्या तिशीनंतर सांध्यांवर जास्त दबाव टाकू नका. धावणे आणि उडी मारणे यांसारख्या उच्च प्रभावाच्या व्यायामाऐवजी, पोहणे, सायकलिंग आणि योगासने असे कमी प्रभावाचे व्यायाम करणे चांगले आहे.
व्यायामाचा मुख्य उद्देश तंदुरुस्त राहणे आणि आपले आरोग्य सुधारणे हा आहे. त्यामुळे या चुका टाळा आणि निरोगी राहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :