Fashion Tips : प्रत्येक ड्रेस उंच मुलींना शोभतो असं लोकांना म्हणताना तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण, मग कमी उंचीच्या मुलींचे काय? अनेक वेळा लहान उंचीच्या मुलींना कोणतीही स्टईल अंगीकारण्यासाठी किंवा त्यांचे आवडते कपडे घालण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असतो. कोणतेही कपडे परिधान करताना किंवा कोणतीही नवीन फॅशन (Fashion Tips) ट्राय करताना लहान उंचीच्या मुलींना अनेकदा एकच प्रश्न पडतो की माझी उंची खूप लहान तर दिसत नाही ना? तुमच्याही बाबतीत असंच काही घडतं का? जर तुमचं उत्तर 'हो' असेल तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. 


लहान उंचीच्या मुलींनी फॅशनच्या बाबतीत काही चुका करणं टाळलं पाहिजे. अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे लहान मुलींची उंची अधिक कमी दिसते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


हेव्ही लेयर्स 


अनेक लेयर्स किंवा फ्रिल असलेले कपडे लहान उंचीच्या मुलींना अजिबात शोभत नाहीत. खूप लेयर्स असलेले कपडे परिधान केल्याने उंची आणखी कमी दिसते. जर तुम्हाला लेअरिंग खूप आवडत असेल तर तुम्ही मोनोक्रोम लूक ट्राय करू शकता. यामुळे तुमची उंची थोडी जास्त दिसते. 


ओव्हरसाईझ टॉप आणि जास्त लांबीचा ड्रेस 


आजकाल ओव्हरसाईजचे कपडे खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे कपडे परिधान केल्यानंतर तुम्हाला खूप आरामदायी वाटते. पण जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही या स्टाईलचा जास्त लाभ घेऊ शकत नाहीत. याचं कारण असं की, सैल कपडे परिधान केल्याने तुमचं पूर्ण शरीर झाकलं जातं. यामुळे शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागांमध्ये फरक करणं फार कठीण होतं. ज्यामुळे तुमचं शरीर फार लहान दिसते. यासाठी तुम्ही व्यवस्थित बसणारे कपडे परिधान करावेत. 


मोठ्या पॅटर्नपासून दूर राहा 


लहान उंचीच्या मुलींनाी मोठे आणि ठळक प्रिंट असलेले कपडे परिधान करू नयेत. हे तुमच्या शरीराच्या बहुतेक भागांना कव्हर करेल आणि तुम्हाला अधिक कॉम्पॅक्ट दिसेल. त्याऐवजी, लहान किंवा मध्यम प्रिंट असेलेले कपडे परिधान करा. त्यामुळे तुमची उंची जास्त दिसेल. 


बल्की शूज 


वेज हील सॅंडल पेन्सिल हीलपेक्षा जास्त सुरक्षित असतात. आणि परिधान करायलाही फार आरामदायक असतात. पण, कमी उंचीच्या मुलींनी अशा प्रकारच्या सॅंडल वापरू नयेत. यामुळे तुमची उंची आणखी कमी दिसते. जर तुम्हाला वेज हील्स खूप आवडत असतील तर स्लिम स्टॅप्स आणि न्यूड कलरच्या घ्या. यामुळे तुम्ही उंच दिसाल. 


ओव्हरसाईज बॅग 


ज्या लोकांना भरपूर सामान घेऊन जाण्याची सवय असते त्यांच्यासाठ ओव्हरसाईज बॅग फार चांगली पसंती आहे. पण जर तुमची उंची कमी असेल तर ओव्हरसाईज बॅगा तुमच्यासाठी चांगला पर्याय नाही. अशा वेळी तुम्ही फक्त छोट्या किंवा मध्यम आकाराच्या बॅग घेऊ शकता. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Calcium Rich Fruits : 'या' 10 फळांमध्ये दूध आणि चीज इतकेच कॅल्शियम, 206 हाडं होतील मजबूत; आयुष्यही वाढेल