Triptii Dimri : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओलच्या (Bobby Deol) 'अॅनिमल' (Animal) या चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तृप्ती दिमरीला नवीन नॅशनल क्रश म्हणून टॅग केलं आहे.
तृप्ती डिमरीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले होते. तृप्ती डिमरीच्या चाहत्यांना ते खूप आवडले. आता या सगळ्यानंतर तृप्ती डिमरीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तृप्ती डिमरी पूर्णपणे नवीन अंदाजात दिसत आहे.
तृप्ती डिमरीचा भन्नाट डान्स
'अॅनिमल' फेम अभिनेत्री तृप्तीचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तृप्ती डिमरी जबरदस्त डान्स करताना दिसली. व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी तिच्या मैत्रिणींसोबत हिरव्या रंगाच्या सिमरी कटआउट ड्रेसमध्ये दिसत आहे. तृप्तीने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘बोले चुडिया’ या गाण्यावरही डान्स केला.
रिव्हेंज थ्रिलर 'अॅनिमल'ने तृप्ती दिमरीला स्टारडम मिळवून दिले. तृप्ती व्यतिरिक्त, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांचा समावेश होता. तृप्तीची प्रसिध्दी भलतीच वाढली आहे. अभिनेत्री आता जिथे जाते तिथे स्वतःकडे लक्ष वेधून घेत आहे. जेव्हा तृप्तीने तिच्या मैत्रिणीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फुटेज शेअर केले तेव्हा इंटरनेटवर पूर्णपणे धुमाकूळ घालत होते.
इतर महत्वाच्या बातम्या