Fashion : प्रत्येक महिलेसाठी साडी म्हणजे आवडता विषय.. पण उन्हाळ्यात साडी नेसणे म्हणजे नको वाटते.. कारण एकतर आधीच कडक ऊन, त्यात शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारा.. यामुळे महिला ड्रेस घालण्यास पसंती देतात. पण आज आम्ही तुम्हाला उन्हापासून दिलासा मिळेल अशा ब्लाऊजचे लेटेस्ट डिझाईन्सबद्दल सांगत आहोत. अशा प्रकारचे ब्लाउज डिझाइन साडीसोबत परिधान केल्याने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळू शकतो.
उष्णतेपासून आराम मिळेल..!
आजही भारतात अनेक महिला साडी नेसतात. उन्हाळ्यात साडी नेसणे म्हणजे दिवसभर उन्हाचा त्रास होतो. अउन्हाळ्याच्या सीझनमध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, उष्णतेपासून संरक्षण करणारे कपडे घालणे खूप महत्वाचे आहे. अनेक महिला उन्हाळ्यात आधुनिक आणि आरामदायक कपडे घालून आरामात जगतात. पण, आजही अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या साडीशिवाय कोणतेच वस्त्र घालण्यास पसंती देत नाही नाहीत. त्यामुळे आज आम्ही उन्हाळ्यापासून दिलासा देण्यासाठी उपाय घेऊन आलो आहोत. अशा प्रकारचे ब्लाउज डिझाइन साडीसोबत परिधान केल्याने तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळू शकतो. उन्हाळ्यात दिवसभर साडी नेसणे खूप अवघड असते, कारण साडीचे फॅब्रिक खूप लांब असते आणि ते संपूर्ण शरीर झाकते. म्हणून, उन्हाळ्यात असे ब्लाउज जे साडीसोबत परिधान केल्यास तुम्हाला आरामदायक वाटेल
'अशा' डिझाईन्सचे ब्लाउज घातल्याने आराम मिळतो
आजकाल, बाजारात विविध प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत आणि त्यांच्यासोबत जोडण्यासाठी भरपूर ब्लाउज डिझाइन देखील आहेत. आरामासोबतच हे ब्लाउज डिझाइन तुम्हाला खूप स्टायलिश बनवते. आज आम्ही तुम्हाला अशा ब्लाउज डिझाइन्सबद्दल सांगणार आहोत, जे परिधान करून तुम्ही स्वतःला उष्णतेपासून वाचवू शकता.
कट-स्लीव्ह ब्लाउज
कट-स्लीव्ह ब्लाउज उन्हाळ्यात आरामदायक असतात आणि हवेशीर कपड्यांशी चांगले जुळतात. हे ब्लाउज खूप स्टायलिश आणि एलिगंट लुक देतात.
स्लीव्हलेस किंवा नेट डिझाइन
स्लीव्हलेस किंवा नेट ब्लाउज उन्हाळ्यात अधिक थंडपणा देतात आणि सहज श्वास घेण्यास मदत करतात. हे परिधान केल्याने तुम्हाला घामही कमी येतो.
अपडेटेड डिझाइन ब्लाउज
रफ लाइन ब्लाउज किंवा ओव्हरलॅप ब्लाउज उन्हाळ्यात स्टायलिश आणि फ्रेश लुक देतात आणि तुमचा संपूर्ण लुक अनोखा आणि स्टायलिश बनवतात.
ऑफ शोल्डर ब्लाउज
ऑफ शोल्डर ब्लाउज उन्हाळ्यात तुमच्या साडीसोबत जोडणे चांगले. हे शरीराच्या प्रत्येक प्रकारावर चांगले आणि स्टाइलिश दिसते.
कोल्ड शोल्डर ब्लाउज
या ब्लाउजची रचना ऑफ शोल्डर ब्लाउजसारखीच आहे, त्यात आणखी एक पट्टी जोडली आहे. अशा प्रकारचे ब्लाउज डिझाइन घालून तुम्ही खूप सुंदर दिसू शकता.
बॅक-लेस ब्लाउज
साडीसोबत असे ब्लाउज डिझाइन केल्याने तुम्ही खूप हॉट आणि क्लासी दिसता. तसेच, उन्हाळ्यात घालण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
हेही वाचा>>>
Fashion : फॅमिली पिकनिकला चाललात? 'हे' लेटेस्ट को-ऑर्ड सेट दिसतील Best! फोटो येतील छान, वाटेल आरामदायी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )