Fashion : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीचा धाकटा लेक अनंत आणि मर्चंट कुटुंबियांची लाडकी लेक राधिका हिचा विवाह शुक्रवारी मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही लग्नाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. या लग्नात अंबानी-ंमर्चंट कुटुंबासोबतच पाहुणे-मंडळींची स्टाइलही चर्चेत होती. यामध्ये नवरदेवाची बहीण ईशा अंबानी कशी मागे राहील? ईशाने गळ्यात घातलेल्या महागड्या हिऱ्याच्या नेकलेसने लोकांना आश्चर्यचकित केले. माहितीनुसार, ईशा अंबानीचा 'तो' हार बनवायला तब्बल 4 हजार तास लागले, भावाच्या लग्नात बहिणीची जादू कायम होती. जाणून घ्या ईशा अंबानीच्या हारची खासियत...
ईशाच्या महागड्या डायमंड नेकपीसने वेधले लक्ष..!
अनंत अंबानीच्या लग्नाच्या दिवशी ईशा अंबानीने खूप महागडा डायमंड नेकपीस घातला होता, ज्याचे नाव 'गार्डन ऑफ लव्ह' असे आहे. त्यापलीकडे ईशाचा पोशाखही अतिशय सुंदर होता. पण तिच्या पोशाखापेक्षा डायमंड नेकलेसच सर्वांत लक्ष वेधून घेत होता. या डायमंड नेकपीसमध्ये अनेक हिरे होते. या नेकलेसच्या नावासोबतच त्याची खासियतही चर्चेचा विषय ठरली, लग्नात ईशाचा लूक आणि तिच्या खास नेकलेसबद्दल जाणून घेऊया..
भावाच्या लग्नात बहिणीच्या लूकची चर्चा
अनंत अंबानींच्या लग्नाच्या मिरवणुकीनंतर ईशा अंबानीने मनीष मल्होत्राची डिझाइन केलेली फुलांची पांढरी साडी नेसली होती. ज्यावर गुलाबी, केशरी आणि हलक्या फुलांची नक्षी होती. बॉर्डरवर सोन्याचे बारीक नक्षीदार काम होते. यासोबत तिने वन-थर्ड स्लीव्हज असलेला मॅचिंग ब्लाउज घातला होता. हा सुंदर पोशाख सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अदजानियाने स्टाइल केला होता.
साडीसोबत दुपट्ट्यात दिसली 'राजकुमारी'
ईशाने तिची साडी गोल्डन दुपट्ट्यासह स्टाईल केली होती, ज्यामुळे तिचा लूक रॉयल दिसत होता. संपूर्ण दुपट्ट्यावर रेशीम धाग्याची नक्षी, जरी आणि जरदोजीचे काम ठळकपणे दिसत होते. साडीप्रमाणेच गोटा पट्टीसह दुपट्ट्यावरही फ्लॉवर एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. एकीकडे स्टाईल करून ईशा राजकुमारी प्रमाणे दिसत होती.
'गार्डन ऑफ लव्ह' हारची खासियत
अनंतच्या लग्नात ईशा अंबानीने दुर्मिळ गुलाबी, निळा, हिरवा आणि केशरी हिऱ्याचा हार घातला होता. या सेटला ज्वेलर्स कांतीलाल छोटेलाल यांनी 'गार्डन ऑफ लव्ह' असे नाव दिले आहे. कारण ते हिऱ्यांनी बनवलेल्या बागेसारखे आहे, कारागिरांना हा हार तयार करण्यासाठी 4,000 तास लागले.
ईशाची अप्रतिम ज्वेलरी
भावाच्या लग्नात ईशाचा केवळ हिऱ्यांचा फ्लोरल डिझाईनचा नेकलेसच नाही तर फुलांची अंगठीही अप्रतिम दिसत होती. यासोबत मॅचिंग कानातले, तीन मोठे हिरे असलेला मांग टिक्का आणि मेहंदीवाल्या हातात हिऱ्याच्या बांगड्या अतिशय सुंदर दिसत होत्या. न्यूड बेस्ड मेकअप तिचा रॉयल लुक वाढवत होता. केसा मोकळे ठेवून ईशाचा लूक एकदम नॅचरल वाटत होता.
फर्स्ट लूकमध्येही हाच नेकलेस दिसला होता
ईशाने तिच्या फर्स्ट लूकसाठी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला पेस्टल पीच लेहेंगा निवडला. ज्यावर जरदोसी एम्ब्रॉयडरी आणि क्रिस्टल वर्कही पाहायला मिळाले. ईशाने हिऱ्यांनी जडवलेला महाराणी शैलीचा फ्लोरल डिझाईनचा नेकलेस देखील परिधान केला होता. मात्र, थोड्या वेगळ्या लूकसाठी तिने बटरफ्लाय रिंगही घातली होती.
हेही वाचा>>>
Fashion : 160 वर्ष जुन्या साडीपुढे इतर फॅशन फेल! अनंत राधिकाच्या लग्नात आलियाची जादू, 'त्या' साडीची खासियत जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )