Eye Care Tips : डोळ्यांखाली दिसणाऱ्या डार्क सर्कल्समुळे (Dark Circle) तुमचा चेहरा खराब दिसू शकतो. त्यामुळे अनेकदा तुम्ही आजारी असल्यासारखे दिसतात. पण, आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे (Lifestyle) जसे की, रात्री उशिरा जोपणे, योग्य आहार न घेणे आणि वाढत्या वयामुळे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स दिसू लागतात. डार्क सर्कल्स लपवण्यासाठी महिला कंन्सीलरसारखे मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण हा तात्पुरता पर्याय आहे. यामुळे तुम्हाला काही मिनिटांसाठी आराम मिळेल. 


जर तुम्हाला डार्क सर्कल्सवर कायमचा उपाय हवा असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांचा देखील वापर करू शकता. हे गरगुती उपाय कोणते ते जाणून घेऊयात. 


बटाटा (Potato)




जवळपास प्रत्येक भाजीत वापरला जाणारा बटाटा यावर रामबाण उपय आहे. यासाठी तुम्हाला बटाटा सोलून त्याचा रस काढावा लागेल. त्यानंतर कापसाच्या मदतीने तुम्ही हा रस चेहऱ्यावर लावू शकता. साधारण 5 ते 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता. तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल. 


चहाचे पाणी 


यासाठी तुम्हाला चहा पावडरला पाण्यात टाकून काही वेळ त्याला उकळू द्यायचं आहे. पाणी थंड झाल्यावर कापसाने हे पाणी डोळ्यांच्या खाली लावा. तोड्या वेळानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. 


थंड दूध (Cold Milk)




यामध्ये दूध देखील फायदेशीर ठरू शकते. यासाठी, तुम्हाला थंड दुधात कापूस भिजवावा लागेल. आणि बंद पापण्यांवर साधारण 15 मिनिटे ठेवावे लागेल. दुधामध्ये असलेले लैक्टिक ऍसिड चेहऱ्यावर ग्लो आणण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकते.


गुलाब पाणी


गुलाब पाणी डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. अशा वेळी, कापसाच्या मदतीने, 10 मिनिटे बंद पापण्यांवर गुलाब पाणी ठेवा. यामुळे तुमच्या डोळ्यांना थंडावा जाणवेल. हे सूज आणि डार्क सर्कल्स कमी करण्यास देखील मदत करू शकते.


काकडीचे काप 


काकडीचे गोल काप करून साधारण 10 ते 15 मिनिटे डोळे मिटून ठेवा. काकडीत अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉईड्स असतात जे जळजळ कमी करण्यास आणि डार्क सर्कल्स दूर करण्यास मदत करतात.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Tips : गरोदरपणात हाय हिल्स घालाव्यात की घालू नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?