Don't Drink Water While Standing : मानवी जीवनासाठी पाणी अत्यावश्यक आहे. तहान शमविण्यासाठी पाण्यापेक्षा दुसरा चांगली पर्याय नाही. असं म्हटलं जातं की, उत्तम आरोग्यासाठी दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. असे असले तरी मात्र, आपण पाणी कसे पितो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक लोक उभे राहून पाणी पितात. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण घाईघाईत आणि उभे राहून पाणी पितात. पण उभं राहून पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. ही स्थिती आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकते. या ठिकाणी आम्ही उभे राहून पाणी पिण्याचे काय दुष्परिणाम आहेत ते सांगणार आहोत.

  


ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम :
 
जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही. याशिवाय ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. त्याचा वाईट परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नाही तर हृदयावरही होतो. उभे राहून पाणी प्यायल्याने पोटातील पाण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटाच्या खालच्या भागावर दाब निर्माण होतो आणि अशा परिस्थितीत लोक हर्नियाचे शिकार होतात.
 
तणाव वाढतो
 
उभे राहून पाणी प्यायल्याने तुमचा ताण वाढतो. अनेकांना यावर विश्वास बसणार नाही, पण ही सवय देखील तणाव वाढण्यामागे एक प्रमुख कारण आहे. तज्ज्ञांच्या मते, उभे राहून पाणी पिण्याचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर होतो आणि अशा स्थितीत पोषक तत्व पूर्णपणे निरुपयोगी होतात. याच कारणामुळे या सवयीमुळे शरीराला तणावाचा सामना करावा लागतो.
 
सांधेदुखीचेही कारण :
 
उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघे दुखतात. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांवर दाब पडतो, त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. 
 
संधिरोगाची समस्या :
 
उभे राहून पाणी पिण्यानेही तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. खरं तर, उभं राहून पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातून पाण्याचा प्रवाह वेगाने सांध्यांमध्ये जमा होतो आणि हाडे आणि सांध्यांना धोका निर्माण होतो. त्यामुळे हाडांच्या सांध्याच्या भागात द्रवपदार्थाची कमतरता भासते आणि सांधेदुखीसह हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे लोकांना सांधेदुखीसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :