Sapna Choudhary : प्रसिद्ध हरियाणवी डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Choudhary) हिच्यावर लखनौमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तिच्याविरुद्ध अटक वॉरंटही काढण्यात आले होते. यानंतर तिला अटक करून, कोर्टात हजर करण्यात आले आणि या प्रकरणात आत्मसमर्पण केल्यानंतर तिला जमीन देण्यात आला आहे. एका फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने सपनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, त्यानंतर ती आज (20 सप्टेंबर) न्यायालयात हजर राहिली होती. मात्र, सरेंडर केल्यानंतर काही वेळातच न्यायालयाने सपना चौधरीचे वॉरंट मागे घेतले आहे.


या प्रकरणी भविष्यात होणाऱ्या सुनावणीला हजर राहून सहकार्य करेल, या अटीवर न्यायालयाने सपनाचे (Sapna Choudhary) अटक वॉरंट रद्द केले आहे. सपना आज तिच्या वकिलासमवेत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शांतनु त्यागी यांच्यासमोर हजर झाली होती. यावेळी तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान ती सुमारे दोन तास पोलीस कोठडीत होती.


दोन तासांची कोठडी अन् सुटका!


सपना चौधरी सोमवारी न्यायालयात हजर झाली. सपनाने आपले अटक वॉरंट मागे घेण्यासाठी वकिलामार्फत अर्ज केला होता. या प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु, वकिलाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्ज प्रलंबित राहिला होता. मात्र, आज सपना (Sapna Choudhary) न्यायलयात हजर राहिली आणि तिने सरेंडर केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावाणी 30 सप्टेंबरला होणार आहे.


नेमकं प्रकरण काय?


आशियाना पोलिस स्टेशन चौकीचे उपनिरीक्षक फिरोज खान यांनी 13 ऑक्टोबर 2018 रोजी सपना चौधरी, रत्नाकर उपाध्याय, अमित पांडे, इबाद अली, नवीन शर्मा आणि जुनैद अहमद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 10 या वेळेत सपनासह इतर कलाकारांचा कार्यक्रम स्मृती उपवनमध्ये पार पडणार होता. या कार्यक्रमाच्या तिकिट्स तीनशे रुपये दराने विकल्या गेल्या होत्या. मात्र, सपना (Sapna Choudhary) या शोला हजरच राहिली नाही. रात्री 10 वाजेपर्यंत सपना चौधरी न आल्याने लोकांनीही गोंधळ घातला होता. यानंतर तिच्या विरोधात तकार दाखल करण्यात आली होती.


या प्रकरणी न्यायालयात हजर न राहिल्याने 17 नोव्हेंबर 2021 रोजी सपनाविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी सपनाने वॉरंट रद्द करण्याची विनंती केली होती, जी कोर्टाने फेटाळली होती. त्यानंतर 10 मे रोजी सपनाने न्यायालयात आत्मसमर्पण केले, त्यानंतर तिला अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र, पुन्हा सुनावणीस न आल्याने तिला नोटीस पाठवण्यात आली. नोटीस देऊनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, आता चौकशीत सहकार्य करण्याच्या अटीवर तिला जामीन देण्यात आला आहे.


हेही वाचा :


Sapna Choudhary Case: सपना चौधरीच्या अडचणी वाढल्या, लखनौ कोर्टाकडून अभिनेत्री विरोधात अटक वॉरंट जारी


Fat to Fit : एकेकाळी वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झालेली Sapna Choudhary; आता फिटनेसमध्ये बड्या अभिनेत्रींना देतेय टक्कर