Health Tips : उन्हाळ्याला (summer) सुरूवात झाली आहे. आता काही लोकांनी फ्रीजमधील (fridge) किंवा माठातील थंड पाणी प्यायला सुरूवात केली आहे. उन्हाळ्यात लोकांना आईस्क्रिम खायला देखील आवडते. फ्रीजमधील पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, जाणून घेऊयात याबद्दल माहिती...
जर तुमची इम्यूनिटी कमजोर असेल तर तुम्ही फ्रीजऐवजी माठामधील पाणी प्यावे. इम्यूनिटी कमी असणाऱ्या लोकांनी जर फ्रीजमधील पाणी पिले तर त्यांना घसा खवखवणे, खोकला आणि डोके दुखी इत्यादी समस्या जाणवू शकतात.
अनेकांना सकाळी कोमट पाणी प्यायची सवय असते. पण उन्हाळ्यामध्ये रूम टेंप्रेचर असणारे पाणी पिणे योग्य ठरेल. रूम टेंप्रेचर असलेलं पाणी प्यायल्यानं कोणत्याही समस्या होत नाहित. तसेच बाहेर उन्हामध्ये फिरून आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यानं ताप येणं आणि सर्दी होणं या समस्या जाणवतात. त्यामुळे बाहेर फिरून आल्यानंतर माठातील किंवा साधे रूम टेंप्रेचर असाणारे पाणी प्यावे.
रोज किती पाणी प्यावे?
सकाळी उठल्यानंतर 3 ग्लास पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासांनंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा. त्या आधी काहीही खाऊ नये. पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : रोज ओट्स खाल्ल्याने आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे, वजनही होईल कमी
- Health Tips : स्मरणशक्ती वाढवायचीय? 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha