Raju Shetti : बळाचा वापर करुन महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कनेक्शन कट करण्याचे सत्र सुरु होते. त्यामुळे राज्यातील शेतकरी संतप्त झाले होते. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरु होती. अखेर सरकारने पुढचे तीन महिने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी केली जाणार नसल्याची घोषणा केली आहे. आता उर्जामंत्र्यांनी वीज बिले दुरुस्त करण्याचे तत्काळ आदेश द्यावेत, शेतकरी अवास्तव बिले भरणार नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत केले आहे.  


दरम्यान, ऐन उन्हाळ्यात वीज कनेक्शन कट केल्यामुळं शेतकऱ्यांची पिकं करपून जात होती. त्याविरोधीत स्वाभिमानीची विविध ठिकाणी आंदोलने सुरु होती. अखेर वीज तोडणी करणार नसल्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी दिलासा मिळाला आहे. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने स्वाभिमानीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. तसेच  राजू शेट्टी पंधरा दिवस कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांसोबत धरणे आंदोलनास बसले होते. राज्यभरात शेतकर्‍यांकडून शेट्टीसाहेबांच्या समर्थनार्थ रास्तारोको आंदोलनही करण्यात आले होते. राज्यभरातील शेतकर्‍यांचा रोष अखेर सरकारपर्यंत पोहोचला. सरकार जागे झाले आणि अखेर निर्णय झाला. हा शेतकर्‍यांचा आणि राजू शेट्टी यांनी दिलेल्या लढ्याचे यश असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रवक्ते रणजित बागल यांनी व्यक्त केले आहे. तसेच भविष्यात महावितरणच्या या वसुलीविरोधात वेळोवेळी लढत राहू असेही बागल यावेळी म्हणाले.


दरम्यान, काल सभागृहात ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडणी केली आहे, त्यांचा वीजपुरवठा पुर्ववत केला जाणार असल्याचे वक्तव्य नितीन राऊत यांनी केले. तसेच शेतकऱ्यांच्या हातात पुढचे पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडीत केला जाणार नसल्याचं राऊत यांनी सभागृहात सांगितलं. या मुद्यावरुन सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला होता. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी केली होती, त्या शेतकऱ्यांची वीज जोडली जाणार असल्याचे राऊत यांनी सभागृहात सांगितले. शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पिक येईपर्यंत पुढचे तीन महिने वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवत आहोत असे राऊत म्हणाले. दरम्यान, या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.


महत्त्वाच्या बातम्या: