Health Tips : उन्हाळा सुरु झाला की, बाजारात फणसाची आवक सुरु होते. भाजीचा फणस, रसाळ गोड फणस असे वेगवेगळे फणसाचे प्रकार पाहायला मिळतात. या दिवसांत प्रत्येक घरात फणसाची भाजी बऱ्याचदा बनवली जाते. फणसाचीची भाजी चवदार आणि आरोग्यदायी असते. ही भाजी बनवण्याचे अनेक मार्ग आहेत. व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक फणसात आढळतात. परंतु, काही वेळा काही लोक फणस खाल्ल्यानंतर अशा गोष्टी खातात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. चला तर जाणून घेऊया, फणस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत...

पपई : फणसाची भाजी किंवा फणस खाल्ल्यानंतर पपई खाऊ नये. असे केल्यास त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. तसेच तुम्हाला लूज मोशनची समस्या देखील उद्भवू शकते.

दूध : अनेकजण फणसाच्या भाजीनंतर दूध पितात. परंतु, तुम्ही असे कधी चुकुनही करू नये. त्यामुळे पोटात सूज येण्यासोबतच त्वचेवर पुरळ उठू शकते. यामुळे अनेकांना पांढरे त्वचेवर डाग पडण्याची समस्या देखील सुरू होते. अशा लोकांनी यापासून दूर राहावे.

भेंडी : फणस खाल्ल्यानंतर भेंडी देखील खाऊ नयेत. जर, तुम्ही फणसानंतर भेंडी खाल्ली, तर तुम्हाला पाय दुखण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय अॅसिडिटीच्या समस्येलाही सामोरे जावे लागेल.

पान : बहुतेक लोकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही फणसाची भाजी खाल्ली असेल, तर त्या नंतर कधीही पान खाऊ नका. याने देखील अनेक समस्या उद्भवू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :