Dressing Tips For Interview : इंटरव्ह्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. कारण त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपल्या करियरचा ग्राफ त्यावरच अवलंबून असतो. केवळ वीस मिनिटांचा इंटरव्ह्यू सगळं काही ठरवणार असतो. त्यामुळे हा इंटरव्ह्यू फारच महत्त्वाचा असतो. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही कसे दिसता, कसे वावरता आणि कसे बोलता, अशा सगळ्या गोष्टींकडे पाहिलं जातं.


त्यामुळे तुमच्याकडे किती ज्ञान आहे, ते तर पाहिलं जाणारच आहे. मात्र त्यासोबतच तुम्ही दिसता कसे आणि बोलता कसे याचाही आढावा या इंटरव्ह्यूमध्ये घेतला जात असतो. यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घालत असलेले कपडे. कपड्यांचाही तुमच्या इंटरव्ह्यूवर परिणाम होत असतो. जर तुम्ही योग्य प्रकारे कपडे घातलेले नसतील, तर मात्र, तुमचा नकारात्मक प्रभाव मुलाखत घेणाऱ्यांवर पडू शकतो. कारण इंटरव्ह्यूमध्ये सर्वांत पहिलं इम्प्रेशन तुमच्या कपड्यांमुळेच पडतं. त्यामुळेच कपडे निवडताना चुका करु नका. 


सूटचे फिटींग


लक्षात घ्या, जर तुमचे कपडे चांगल्या फिटींगचे नसतील तर तुम्ही तुमच्या लूकवर घेतलेली मेहनत वाया जाईल. कमीतकमी त्याच्या फिटींगमध्ये तरी गोंधळ आणि गडबड नको. सूटच्या खांद्यांवर फिटींग, बाह्यांची लांबी आणि कोटची लांबी, अशा काही गोष्टी फारच महत्त्वाच्या असतात. त्याकडे जरुर लक्ष द्या.  


जीन्स घालू नका


इंटरव्ह्यूमध्ये जीन्स चालत नाही. कारण, जीन्समुळे प्रोफेशनल लूक येत होत नाही. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रोफेशनल लूकची आवश्यकता असते. जर तुम्ही प्रोफेशनल लूकचा ब्लेझर घातला असेल आणि खाली जीन्स असेल तर तुम्ही चांगले दिसणार नाही. जीन्स कधीही घालू नका. ते प्रोफेशनल ड्रेंसिंगमध्ये मोडत नाही.  


ओव्हर वाटेल असे काही करू नका


स्टायलिंग करतानाही काही गोष्टी ओव्हर होऊ नयेत, याचीही काळजी घ्या. बो टाय, मेटेलिक टाय आणि सूटचा ऑफबीट रंग इंटरव्ह्यूमध्ये योग्य दिसत नाही. सूटच्या कलरवरही फार लक्ष द्या. डार्क कलरचा सिम्पल सूटच इंटरव्ह्यूमध्ये योग्य दिसतो.  


एक्सेसरीज फाॅर्मल घाला


इंटरव्ह्यूच्या दरम्यान असलेल्या एक्सेसरीज देखील फॉर्मल लूकच्याच असायला हव्यात. जर त्या तशा नसतील, तर केलेली मेहनत वाया जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही पूर्ण कपडे फॉर्मल घातलेले असतील आणि घड्याळ मात्र एकदम फॅन्सी घातलेले असेल तर ते तुमचा संपूर्ण लूक बिघडवून टाकेल. 


स्नीकर्स घालू नका





तुमच्याकडे भलेही स्नीकर्सचे उत्तम कलेक्शन असेल मात्र, ते इंटरव्ह्यूमध्ये घालू नका. स्नीकर्स आता ऑफिसमध्येही चालतात. मात्र, म्हणून इंटरव्ह्यूला ते घालून जाऊन का. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Marks On Face : चेहऱ्यावर चष्म्यामुळे डाग पडले आहेत? करा 'हे' घरगुती उपाय