Diwali 2024 Travel: दिवाळीचा सण हा आनंद आणि उत्साह घेऊन येतो. अशात विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून दिवाळीची सुट्टी दिली जाते, साधारण 2 आठवडे ही सुट्टी असू शकते. तसं पाहायला गेलं तर आजकाल मुलांवर शाळा आणि अभ्यासाचा ताण वाढत चाललाय. बरेचदा मुलांना शाळांमध्ये खूप गृहपाठ मिळतो. इतकंच नाही तर शाळा सुटल्यावर घरी आल्यानंतर पुन्हा गृहपाठ करायला लागतात, मग ट्यूशन आणि अभ्यासाला जातात, अशा गोष्टींमुळे मुलांना खूप ताण येऊ लागतो. यामुळेच मुले स्वभावाने चिडचिडी होऊ लागतात. अशात जर पालकांनी आपल्या मुलांसोबत वेळ घालवला किंवा त्यांना बाहेर फिरायला घेऊन गेल्यास त्यांचा ताण कमी होऊन ते पुन्हा नव्या जोमाने अभ्यासाला लागू शकतात. सध्या दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने तुम्ही तुमच्या मुलांना फिरायला बाहेर घेऊन जाऊ शकता. जाणून घ्या..
दिवाळीच्या सुट्टीत मुलांना फिरवण्याची संधी!
मुलांना वीकेंडला किंवा सुट्ट्यांमध्ये आपल्या कुटुंबासोबत बाहेर जायला आवडते. दर वीकेंडला ते बाहेर जाण्याचाही आग्रहही धरतात. पण पालक त्यांच्या सुट्टीतील एक दिवस घरी आरामात घालवण्याचा विचार करतात. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मुलांना सकारात्मक वातावरण मिळते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पालकांशी आणि भावंडांशी जोडलेले वाटते. पण रोजच्या कामाने पालक इतके थकतात की, एक दिवस फक्त विश्रांती घेण्याचा विचार करतात. तुम्हीही असे करत असाल तर त्यात काही बदल करावेत. प्रत्येक वीकेंडला तुम्ही तुमच्या मुलांसोबत बाहेर जाण्यास सक्षम नसले तरीही, तुम्ही कधीतरी जाण्याचा प्लॅन बनवावा. यामुळे मुलांवरील शाळेचा आणि गृहपाठाचा ताण दूर होतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वीकेंडला तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता?.
निसर्गाशी संबंधित ठिकाणं
मुलांचा ताण कमी व्हावा असे वाटत असेल तर त्यांना निसर्गाशी निगडित ठिकाणी घेऊन जावे. यामुळे त्यांना ताजेतवाने वाटते आणि शाळेच्या गृहपाठाच्या चिंतेतून त्यांना थोडा वेळही मिळतो. कारण घराबाहेर पडताना गृहपाठाचा विचार त्यांच्या मनात येत नाही. इतकंच नाही तर जेव्हा मुलं निसर्गाच्या जवळ असतात तेव्हा त्यांना झाडं, वनस्पती, पक्षी आणि इतर प्राण्यांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते.
मनोरंजन पार्क
एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा पार्कमध्ये गेल्याने स्विंग्ज आणि इतर मजेदार राइड मुलांचा ताण कमी करण्यास मदत करतात. येथे गेल्याने मुले शारीरिक आणि आंतरिकदृष्ट्या मजबूत होतात. येथे त्यांना नवीन उपक्रम करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांच्यातील आळसही कमी होतो. त्यामुळे, जर तुम्हाला वीकेंडला जास्त खर्च न करता तुमच्या मुलांना कुठेतरी घेऊन जायचे असेल तर मुलांसोबत फिरण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.
थीम पार्क आणि फन झोन
मुलांना थीम पार्क आणि फन झोन सारखी ठिकाणे देखील आवडतील. दररोज मुले अभ्यासात व्यस्त असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी खेळणे, उडी मारणे आणि मजा करणे देखील महत्त्वाचे आहे. थीम पार्कमध्ये मुले विविध प्रकारचे खेळ, अॅक्टिव्हिटी करतात. ज्यामुळे त्यांना फ्रेश वाटतं. ट्रॅम्पोलिन पार्क किंवा बाउंसिंग क्षेत्रासह एक मजेदार ठिकाण देखील आहे.
हेही वाचा>>>
Health: अजबच! टेन्शनमुळे मूल होण्याची शक्यता वाढते? संशोधनात धक्कादायक दावा; शास्त्रज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )