Diwali 2023 : आनंदाचा आणि उत्साहाचा दिवाळी (Diwali 2023) सण सुरु झाला आहे. दिवाळीत घरी साफसफाईपासून फराळाची तयारी केली जाते. दिवे लावले जातात, फटाके फोडले जातात. खरंतर, अनेकांना दिवाळीचा सण फटाक्यांशिवाय अपूर्ण वाटतो. मात्र, या फटाक्यांमुळे अनेक लोक अपघाताला बळी पडतात. फटाक्यांमुळे लोकांचे डोळे आणि हातही भाजतात. त्यामुळे फटाके फोडताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला फटाके फोडताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे या संदर्भात काही खास टिप्स सांगणार आहोत.
फटाके वाजवताना 'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या
जेव्हा तुम्ही फटाके फोडता तेव्हा पाण्याची बादली किंवा थोडी वाळू जवळ ठेवा जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडली तर ती लगेच टाळता येईल.
फटाके फोडताना सिंथेटिक आणि नायलॉनचे कपडे घालू नका.
फुटणारे फटाके जपून जाळून टाका आणि फटाके फोडताना हातात धरू नका.
फटाके पेटवल्यानंतर, उरलेले गरम लाकूड सुरक्षित ठिकाणी फेकून द्या जेणेकरून ते कोणाच्याही पायाखाली येणार नाहीत.
फटाके फोडताना लहान मुल तुमच्या बाजूला नसेल याची काळजी घ्या.
फटाक्यांनी पेट घेतल्यास सर्वात आधी 'हे' काम करा
फटाके पेटवताना चुकून हात पाय भाजले तर लगेच थंड पाण्यात बुडवा. जळजळ दूर होईपर्यंत हात पाण्यात बुडवून ठेवा. घाईत चुकूनही बर्फ लावू नका. कारण त्यामुळे रक्त गोठण्याची शक्यता असते.
तुळशीच्या पानांचा रस
फटाके फोडताना तुमचा हात किंवा पाय थोडासाही भाजल्यास तुळशीच्या पानांचा रस जळलेल्या जागेवर लावावा. यामुळे जळजळ कमी होईल आणि कोणतेही जखम राहणार नाही. जखम खोल असेल तर तुळशीची पाने वापरणे टाळा.
खोबरेल तेल
जर कुठे जास्त जळत असेल तर खोबरेल तेलाचा वापर करा. कारण खोबरेल तेल थंड असतं. खोबरेल तेल लावल्याने जळजळ होण्यापासून खूप आराम मिळतो. आणि दागही राहत नाहीत.
बटाट्याचा रस
तुम्ही जळलेल्या भागावर बटाट्याचा रस देखील लावू शकता, त्याचा थंड प्रभाव असतो आणि यामुळे जळजळ शांत होते, ज्यामुळे खूप आराम मिळतो.
चुकूनही कापूस लावू नका
जळलेल्या जागेवर किंवा जखमेवर कापूस लावू नका. कारण ओल्या जखमेवर कापूस लावल्यास तो अडकतो आणि कापूस नंतर काढून टाकल्यास वेदना होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :