Home Decor Items Diwali 2022 : भारतीयांचा वर्षातला सर्वात आवडता सण म्हणजेच दिवाळी (Diwali 2022). याचं कारण म्हणजे या निमित्ताने घरी पाहुणे, मित्र-मंडळी येतात, घरी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. त्याचबरोबर घराच्या सजावटीसाठी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. घराला रंग आणि नवे फर्निशिंग केले जाते. घराचे नूतनीकरण करताना त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. म्हणूनच स्वयंपाकघार खास आणि वापरण्यास सोपे असणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादनक्षमता वाढते, शिवाय सणांच्या निमित्ताने कराव्या लागणाऱ्या स्टोअरेजसाठी जागा तयार होते. 


तुम्हाला देखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकघराचा लूक चेंज करायचा असेल, तर लगेच सुरुवात करायला घ्या. गृहिणी, नोकरदार, तरुण अशा सर्वांना मॉड्युलर किचन आणि स्टोअरेजच्या नाविन्यपूर्ण पद्धती आवडतात, कारण त्यामुळे दैनंदिन जीवन सोपे होते. जागेच्या मर्यादा लक्षात घेत ते आपल्या जीवनशैलीवर जास्त भर देतात. गोदरेज लॉक्सने स्किडो ही नाविन्यपूर्ण उत्पादनश्रेणी लाँच केली आहे, ज्यामुळे आगामी सणांसाठी किचन सज्ज करणे शक्य होणार आहे. 


स्वयंपाकघर स्वच्छ करा : सणांच्या काळात वर्षातून एकदा संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते. घरी पाहुणे येणार असल्यामुळे स्वच्छ आणि नीटनेटके स्वयंपाकघर असल्यास ते आकर्षक तर दिसतेच. पण, त्याचबरोबर स्वयंपाकघरात वावरही करायला कोणालाही आवडतो. तुमचे स्वयंपाकघर छान असले की गृहिणीला स्वयंपाक देखील बनवायला सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांबरोबर, नातेवाईक, मित्रमंडळींबरोबर जास्त वेळ घालवता येतो.  


स्वयंपाकघरातील पसारा आवरा : अनेकदा आपण अतिरिक्त ग्लासवेयर्स आणि मोठी भांडी बॉक्समध्ये भरतो आणि त्यामुळे विनाकारण पसारा तयार होतो. तुमची स्टाईल किंवा उपयुक्तता या निकषांवर न उतरणाऱ्या सर्व गोष्टी स्वयंपाकघरातून काढून टाका. स्वयंपाकघराचं स्वरूप बदलण्याची हीच योग्य वेळ आहे, मग ते तुमचे डिश टॉवेल्स असो किंवा न वापरली जाणारी उपकरणे. पसारा कमी झाल्यानंतर कॅबिनेट्समधे नवी जागा तयार होईल. तिथे मेझानाईन लेवल ट्रेज ठेवून जास्त स्टोअरेज मिळवता येईल आणि मुख्य म्हणजे, त्यात नीटनेटकेपणा येईल. स्वयंपाकघरातील उभ्या ड्रॉवर्सची उपयुक्तता वाढवण्यासाठी ही स्मार्ट पद्धत आहे. 


स्टोअरेजच्या प्रत्येक कोपऱ्याचा वापर करा : मर्यादित जागा असलेले स्वयंपाकघर लावताना जागेचा प्रत्येक इंच वापरणं अतिशय महत्त्वाचे आहे. सणांच्या काळात मिठाई, इतर खाद्यपदार्थ पेयं ठेवण्यासाठी जास्त जागा लागते. म्हणूनच स्वयंपाकघर नीटनेटके असल्यास हे स्टोअरेज सोपे होते. तुमच्या किचनमध्ये स्लाईड ड्रॉवर्स असल्यास तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू अगदी हातालगत ठेवता येतात. तसेच वस्तूंचा पसाराही दिसत नाही. आणि त्या वापरणेही सोपे होते. 


प्रत्येक गरजेसाठी नाविन्यपूर्ण उपाय : भारतीय जेवणात विविधता असल्यामुळे प्रत्येक प्रकारची भांडी वापरली जातात. यामध्ये तवे, मसाल्याचे डबे, ताटल्या, थाळ्या आणि इतर गोष्टी लागतात. बाहेरच्या देशात बनवली जाणारी बास्केट्स किंवा अक्सेसरीज या सर्व गोष्टींसाठी अपुऱ्या पडतात. चांगलं स्वयंपाकघर आकर्षक दिसतं, मात्र नाविन्यपूर्ण सुविधा असलेलं वापरण्यास सोपं स्वयंपाकघर जास्त महत्त्वाचं असतं.


महत्वाच्या बातम्या : 


Technology : सावधान! ग्राहकोपयोगी वस्तूंच्या नावाखाली होतेय फसवणूक; ग्राहकांनी 'अशी' घ्या काळजी