Diwali 2021 Silver Utensils Cleaning Tips: दिवाळी या सणाची वाट लोक उत्सुकतेने पाहतात. सर्वजण आपल्या कुटुंबासोबत दिवाळीमधील भाऊबीज (Bhaubeej),लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशी (Dhanteras) हे सण साजरे  करतात. अनेकांनी दिवाळीच्या तयारीला सुरूवात देखील केली आहे. दिवाळी आधी घरातील वस्तूंची साफ सफाई केली जाते. अनेक लोक देवाच्या पूजेसाठी लागणारी चांदीची भांडी  कमिकल्सचा वापर करून स्वच्छ करतात. अनेक दिवस न वापरलेल्या भांड्यांवर डाग पडू शकतात. जाणून घेऊयात केमिकलचा वापर न करता चांदीची भांडी चकचकीत करायची सोपी पद्धत. 


सॅनिटायझर वापरा 
चांदीची नाणी किंवा भांडी स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा  (Hand Sanitizer) वापर तुम्ही करू शकता. चांदीच्या वस्तूवर हॅंड सॅनिटायझर टाकून थोड्यावेळ तसेच ठेवा. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने ही भांडी स्वच्छ करून घ्या. काहीवेळातच तुमची भांडी चमकायला लागतील.   


टूथपेस्टचा वापर करा 
टूथपेस्टचा वापर तुम्ही दात स्वच्छ करण्यासाठी करत असाल पण चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. टूथपेस्टमध्ये मिठ टाकून ते मिक्स करा. मिठ आणि टूथपेस्टला चांदीच्या भांड्याला लावा. त्याने चांदीच्या भांड्यावर असणारे डाग निघून जातील. 
 
लिंबाचा रस 
लिंबामध्ये  सिट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोणताही धातू त्याने स्वच्छ होऊ शकतो. 1/2 कप लिंबाचा रस घ्या त्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करा. ब्रशचा वापर करून हे मिश्रण चांदीच्या भांड्यांना लावा. त्याने चांदीच्या भांड्यांना चमक येते. तसेच तुम्ही चांदीची भांडी स्वच्छ करण्यासाठी अॅल्‍यूमिनियम फॉयलचा  देखील वापर करू शकता. 


Health Care Tips : जास्त पाणीही शरीरासाठी अपायकारक; बळावू शकतात गंभीर आजार


टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. 


Health Care Tips : सकाळी उठल्यावर पाणी पिणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; काय आहे कारण?


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित