HUTATMA And Siddheshwar EXPRESS  : सोलापूर विभागातील दौंड-कुर्डूवाडी सेक्शनमधील भाळवणी ते वाशिंबे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी सिद्धेश्वर, हुतात्मा एक्सप्रेससह अन्य 15 एक्सप्रेस गाड्या आजपासून सुरू होणार आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर महत्त्वाच्या गाड्या सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाळवणी ते वाशिंबे दरम्यान (26.33 किलोमीटर) रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी मागील दोन महिन्यापांसून काही गाड्या बंद तर काही गांड्याचा मार्ग बदलण्यात आला होता. हे काम पूर्ण झाल्यामुळे आता पुन्हा एकदा हुतात्मा ,सिद्धेश्वर एक्सप्रेसह अन्य गाड्या धावणार आहेत.  

भाळवणी ते वाशिंबे या स्थानकादरम्यान सुरु असलेलं दुहेरीकरणाचं काम 25 ऑक्टोबर रोजी पूर्ण झालं. कामांसोबत सिग्नलच्या यंत्रणेची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज आरोरा यांनी केली. त्यांनंतर मागील दोन-तीन महिन्यांपासून बंद असलेल्या सर्व गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

या गाड्या पूर्ववत होणार -

01139 मुंबई-गदग  विशेष एक्सप्रेस  01140 गदग-मुंबई विशेष एक्सप्रेस02116 सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस 02115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस02207 मुंबई-लातूर विशेष एक्सप्रेस02208 लातूर-मुंबई विशेष एक्सप्रेस 02043 मुंबई-बिदर विशेष एक्सप्रेस 02044 बिदर-मुंबई विशेष एक्सप्रेस06237 म्हैसूर-साईनगर शिर्डी विशेष एक्सप्रेस06238 साईनगर शिर्डी-म्हैसूर  विशेष एक्सप्रेस07614 नांदेड-पनवेल  विशेष एक्सप्रेस07613 पनवेल-नांदेड  विशेष एक्सप्रेस07014 हैद्राबाद-हडपसर विशेष एक्सप्रेस07013 बिदर-मुंबई विशेष एक्सप्रेस         मुंबई-बिदर विशेष एक्सप्रेस     01157/01158 पुणे-सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस

मार्ग परिवर्तन (बदल) करण्यात आलेल्या एक्‍सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित स्थानकावरून धावतील

सांगोला-आर्दशनगर (दिल्ली) किसान रेल्वेसांगोला-मुजफ्फरपूर किसान रेल्वेसांगोला-शालिमार किसान रेल्वेलोकमान्य टिळक टर्मिनस-मदुराईमदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍सप्रेसभुनेश्वर-पुणे एक्‍सप्रेसपुणे-भुनेश्वर एक्‍सप्रेसनागरकोईल-मुंबई एक्‍सप्रेसमुंबई- नागरकोईल एक्‍सप्रेसनागरकोईल-मुंबई एक्‍सप्रेसमुंबई- नागरकोईल एक्‍सप्रेसविशाखापट्टणम-एलटीटी एक्‍सप्रेसएलटीटी-विशाखापट्टणम एक्‍सप्रेसम्हैसूर-वाराणसी एक्‍सप्रेसवाराणसी- म्हैसूर एक्‍सप्रेस

आणखी वाचा :

'होय, मी भंगारवाला, माझा सोळाव्या वर्षांपासून भंगारचा धंदा, मला त्याचा अभिमान' : नवाब मलिक 

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी, पुण्यात स्वस्त तर मुंबईत महागलं