Diwali 2021: लवकरच दिवाळी सणाला सुरूवात होणार आहे. भाऊबीज लक्ष्मी पूजन आणि पाडवा या सणांची लोक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. काही जणांनी दिवाळीच्या तयारीला सुरूवात देखील केली आहे. घर साफ करणे, खरेदी करणे आणि फराळ तयार करणे इत्यादी कामे सर्वजण दिवाळीला करतात. पण या कामांसोबतच त्वचेची काळजी घेणे ही आवश्यक आहे. जाणून घेऊयात दिवाळीमध्ये स्किनची काळजी कशी घ्यावी...
क्लींजरचा करा वापर
दिवाळीमध्ये थंडीचे वातावरण असते. थंडीने त्वचा ड्राय आणि रफ होते. दिवाळीची साफ सफाई करताना त्वचेवर पडणाऱ्या धूळीमुळे त्वचा खराब होऊ शकतो. त्यामुळे मॉइश्चरायजरचा वापर करा. त्याच प्रमाणे तुम्ही क्लींजरचा देखील वापर करू शकता. क्लीनजर वापरल्यानंतर चेहऱ्याला गुलाब पाणी लावून चेहरा कापसाने स्वच्छ करावा.
सनक्रीन क्रिमचा वापर करा
दिवाळीला फटाक्यांमुळे प्रदुषण वाढते. तसेच फटाक्याच्या धूरामुळे स्किनचे पीएच लेव्हल बिघडू शकते. त्यामुळे त्वचा खराब होते. त्यामुळे दिवाळीमध्ये बाहेर खरेदी करायला जायचे असेल तर तुम्ही सनक्रीन क्रिमचा वापर केला पाहिजे. ही क्रिम तुमच्या त्वचेला डॅमेज होण्यापासून वाचवेल.
मधाने करा त्वचेचा मसाज
प्रदुषण आणि धूळ-मातीपासून त्वचेला वाचवायचे असेल तर मध लावून चेहऱ्यावर मसाज करा. मधामध्ये अनेक अॅंटी बॅक्टिरिअल गुण असतात. मधाने 10 मिनीटे मसाज करून थंड पाण्याने चेहरा धुवावा.
दिवाळीची साफ सफाई करताना त्वचेवर पडणाऱ्या धूळीमुळे त्वचा खराब होऊ शकतो. तसेच दिवाळीमध्ये उडवल्या जाणाऱ्या फटाक्याच्या धुराचा देखील त्वचेवर परिणाम होतो.
Weight Loss Tips : पोट कमी करण्यासाठी सोप्या वर्कआउट टिप्स; काही दिवसांतच दिसेल परिणाम
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Health Care Tips : सावध व्हा! हळदीच्या अतिसेवनानं रक्तात होऊ शकते Iron ची कमतरता; काय आहे नुकसान?