Turmeric Side Effects : सणांमध्ये किंवा लग्नामध्ये हळदीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. वेगवेगळे पदार्थ तयार करताना देखील हळद वापरली जाते. जर जखम झाली तर अनेकजण हळदीचा वापर औषध म्हणून करतात. सर्दी झाल्यावर देखील अनेक लोक हळद घातलेले दूध पितात. काही लोकांना झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर हळद टाकून दूध प्यायची सवय असते. आहारामध्ये हळदीचा अति वापर केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
हळदीने इम्यूनिटी बूस्ट होते असे अनेकांचे मतं आहे. हळदीचा आहारामधील अति वापर शरीरातील Iron चे (लोह) प्रमाण कमी करू शकतो. Iron मुळे आपल्या शरीरात रेड ब्लड सेल्स निर्माण होतात. आरोग्यासाठी शरीरात Iron चे योग्य प्रमाण असणे आवश्यक आहे. त्यामुळे आहारामध्ये हळदीचे प्रमाण जास्त नसावे.
हळद अति प्रमाणात खाल्याने पचक्रियेवर परिणाम होऊन अल्सर आणि डोके दुखीचा त्रास देखील तुम्हाला होऊ शकतो. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण हे वेगवेगळं असते. हळदीमुळे शरीरातील उष्णता वाढते. ज्या लोकांना उष्ण पदार्थ खाल्यावर किंवा प्यायल्यावर त्रास होते, अशांनी हळद टाकलेले पदार्थ खाणे टाळावे. उष्णता वाढल्याने स्किनवर फोड येणे किंवा अस्वस्थ वाटणे हे त्रास होऊ शकतात. तसेच ज्या व्यक्तींना यकृताचा त्रास असेल त्यांनी आहारामध्ये हळद घेणे टाळावे.
नपुंसकता येऊ शकते
हळदीमध्ये टेस्टोस्टेरॉची पातळी कमी करते. त्यामुळे स्पर्मची सक्रियता देखील कमी होते.
Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Weight Loss Tips : पोट कमी करण्यासाठी सोप्या वर्कआउट टिप्स; काही दिवसांतच दिसेल परिणाम
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित