Health News : निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी संतुलित असणं गरजेचं आहे. फक्त मानसिक नाही तर शारीरिक दृष्टीही संतुलित असणं महत्वाचं आहे. पण 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी एक काळजी करणारा रिसर्च समोर आलाय. नुकत्याच समोर आलेल्या एका रिसर्चनुसार, वयाच्या पन्नाशीनंतर जर एका पायायवर दहा सेकंदापेक्षा जास्त उभं राहण्यास अडचण येत असेल तर अकाली मृत्यूचा धोका वाढतो. 


नुकतेच 50 वयाच्या पुढील 1702 लोकांवर याबाबतचं संशोधन करण्यात आले. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. वयाच्या पन्नाशीनंतर अनेकांना एका पायावर उभं राहताना अडचण येत असल्याचं समोर आले आहे. संशोधकांनुसार, 10 सेकंद अथवा त्यापेक्षा जास्त वेळ एका पायावर उभं राहण्यास अडचण येत असेल तर अकाली मृत्यूचा धोका वाढतो.  दहा सेकंदापर्यंत एका पायावर उभं राहण्याची क्षमता नसलेल्या व्यक्तींचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता जास्त असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालेय. 


50 वयाच्या पुढील 1702 लोकांवर याबाबतचं संशोधन करण्यात आले. यामध्ये बहुतांश वयोवृद्ध लोकांना दहा सेकंद एका पायवार उभं राहता येत नाही, असे संशोधनातून स्पष्ट झालेय.  51 ते 55 वयोगतील 4.7 टक्के लोकांना एका पायावर दहा सेकंद उभं राहता येत नसल्याचं समोर आलं.  झालं. धक्कादायक म्हणजे 71 ते 75 वयोगटातील 50 टक्केंपेक्षा जास्त लोकांना एका पायावर दहा सेकंद उभ राहात आलं नाही, असे संशोधनातून समोर आलं.  
 
51 ते 55 वयोगटातील 4.7 टक्के लोकांना एका पायावर उभं राहण्याचा टास्क करता आला नाही. तर 56 ते 60 वयोगटाकील 8.1 टक्के, 61 ते 65 वयोगटातील 17.8 टक्के, 66 ते 70 वयोगटातील 36.8 टक्के तर 71 ते 75 वयोगटातील 57.6 टक्के लोकांना एका पायावर दहा सेकंद उभं राहण्याचा टास्क करता आला नाही, असे संशोधनातून समोर आलेय. वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येक पाच वर्षांमध्ये एका पायावर उभं राहण्याची क्षमता कमी होत असल्याचं दिसत आहे. पन्नाशीनंतर एका पायावर संतुलित न राहाता येणाऱ्याची संख्या दुपट्टीनं वाढत असल्याचं संशोधनातून समोर आलेय. 


जे एका पायावर दहा सेकंद उभं राहू शकले नाहीत, ते अनेक आजारांनी ग्रस्त होते. बॅलेन्स टेस्ट ज्यांना जमली नाही, ते लठ्ठ होतो. अथवा हायपरटेंशन, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि डिस्लिपिडेमिया यासारखे आजार होते, असे संशोधनातून समोर आलेय. 
 
कशी केली जाते बॅलेन्स टेस्ट?
 डाव्या अथवा उजव्या पायावर दहा सेकंद अथवा त्यापेक्षा जास्त काळ उभं राहण्याची टेस्ट संशोधनातून घेण्यात आली. याला बॅलेन्स टेस्टही म्हटले जाते. ही बॅलेन्स टेस्ट तुम्ही घरीही करु शकता. कोणत्याही एका पायावार दहा सेकंदापर्यंत उभं राहाण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात शरिरापासून दूर ठेवा. तीन वेळा बॅलेन्स चाचणी करा...