Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात. आजच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मान मोठा असल्याने ती घरी ठेवली जातात. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात. दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. जाणून घ्या याचे महत्व
आपट्याच्या पानाचे महत्व
दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. पण दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात? विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला. दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला म्हणून या दिवशी आपट्याची पाने वाटली जातात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा या चार कृत्यांना अधिक महत्व आहे.विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत.
आपट्याच्या पाने आरोग्यासाठी गुणकारी
आपट्याची पाने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याची आहेत. आपट्याची पाने खाऊन तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता.आपटा ही बहुगुणी वनस्पती आहे. या झाडाची पाने फुले, बिया, सालं औषध म्हणून वापरली जाते. आपट्याला 'अश्मंतक' म्हणूनही ओळखले जाते. अश्मंतक' याचा एक अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा असा आहे. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवला जातो. तर त्याच्या सालापासून डिंक मिळतो. पण त्याव्यतिरिक्तही आपट्याचे बरेच फायदे आहेत.
महाराष्ट्रात आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा
मान्यतेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या-नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असे. विजयी शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि मोठ्यांना व्यक्तींना करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात. त्यामुळे दसर्याच्या दिवशी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या