Kadipatta: नाश्त्याच्या प्लेटमध्ये आलेले कढीपत्त्याची पानं किंवा सूप, भाजीतला कढीपत्ता जर तुम्ही बाजूला काढत असाल तर कढीपत्त्याचे हे फायदे तुम्हाला माहित असणं गरजेचंय. आयुर्वेदानुसार, कढीपाल्याच्या पानांचा वापर मळमळ उलट्या, ॲसिडिटीच्या कुरबुरींपासून चार हात लांब ठेवते. या पानांमध्ये असणाऱ्या पौष्टीक तत्त्वांमध्ये आरोग्याची असंख्य फायदे होतात. कढीपत्ता केवळ जेवणात स्वाद वाढवण्यासाठी वापरतात हा तुमचा गैरसमज आहे. याचे असंख्य फायदे आहेत. दररोज कढीपत्त्याच्या पानांचं सेवन केल्यानं अनेक समस्यांपासून सूटका होण्यासाठी फायदा होतो असं तज्ञ सांगतात.


कढीपत्त्यामध्ये अँन्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, बी, कॅल्शियम, आयर्न आणि फॉस्फरससारखी  पोषकतत्त्वा आहेत. ज्याच्या योग्य पद्धतीनं सेवन केल्यानं याचे पूर्ण फायदे मिळतात.


मधुमेहासाठी कढीपत्ता फायद्याचा


कढीपत्त्याची ८-१० पानं दररोज चावून खाल्यानं मधुमेह नियंत्रणात राहण्यास फायदा होतो असं सांगितलं जातं. या पानांमधील पौष्टीक गुणधर्मांमुळं पचनाच्या समस्या कमी होतात. अतिसार, उलट्या, जुलाब या समस्या रोखण्यासाठीही कढीपत्ता खाण्याचा सल्ला देण्यात येतो.


मुखदुर्गंधीसाठी कढीपत्त्याची पानं चावून खा


अनेकांना मुखदुर्गंधीची समस्या असते. कढीपत्त्यात असणाऱ्या ॲन्टीऑक्सिडंट आणि आयर्नचं अधिक प्रमाण असल्यानं तोंडाच्या दुर्गंधीपासून सूटका होण्यासाठी ही पानं फायद्याची आहेत. २ ते ४ कढीपत्त्याची पानं  चावून खाल्यानं ही समस्याही कमी होते असं सांगण्यात येतं. अनेकांना कढीपत्त्याची पानं खाल्यानं त्रासही होतो. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्यानंच कढीपत्त्याचं सेवन करा.


कढीपत्त्यात फॉलीक ॲसिड मोठ्या प्रमाणावर


कढीपत्त्यात लोह आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. ऍनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता तर असतेच, पण शरीरात रक्त योग्य प्रकारे शोषून घेण्याच्या असमर्थतेशीही त्याचा संबंध असतो. फॉलिक ऍसिड हा एक आवश्यक घटक आहे जो रक्ताला शोषण्यास मदत करतो. जर तुम्हाला ऍनिमियाचा त्रास होत असेल तर त्यावर मात करण्यासाठी दररोज कढीपत्ता खा.


पचनाचे विकार होतात दूर


जर तुमचे पोट सतत खराब राहत असेल, तुम्ही जे काही खाता ते नीट पचत नसेल, तर तुमच्या आहारात कढीपत्त्याचा समावेश करा. आयुर्वेदात असे मानले जाते की कढीपत्त्यामध्ये असे गुणधर्म असतात, जे कोणत्याही अन्नपदार्थाला मऊ करतात आणि ते पचण्यास सक्षम करतात.