Covid-19 : थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण कोविड (Covid-19) दरम्यान सर्दी-खोकला होणे ही चिंतेची बाब ठरु शकते. कारण, सर्दी आणि खोकला हे कोविडचे प्राथमिक लक्षण आहे. त्यामुळे कोविड टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र, या काळात काही गोष्टी खाणे टाळावे. तुम्ही कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? हे जाणून घ्या...
स्ट्रॉबेरी
प्रत्येकाला आवडणारे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी, तुम्हाला वाटेल की हे एक सुपरफूड आहे. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी चांगली आहे, पण तसं नाही. स्ट्रॉबेरीमध्ये स्टेमन म्हणजे पुंकेसर सोडण्याची क्षमता असते. पुंकेसर किंवा स्टेमन हे फुलांच्या वनस्पतींचे नर पुनरुत्पादक पेशी आहेत. त्यांच्या वाढीमुळे तुमच्या नाकात आणि सायनसमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. स्ट्रॉबेरीमुळे सर्दी-खोकला होण्याचे प्रमाणही वाढते. म्हणून त्याचे सेवन टाळावे. कारण याचे सेवन केल्याने तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास जास्त जाणवू शकतो.
मसालेदार अन्न
सर्दी झाल्यास बऱ्याचदा आपल्याला तिखट खाण्याची इच्छा होते. अशा वेळी तिखट आणि तेलकट अन्न खाणे टाळावे. मसालेदार पदार्थ खरंतर फार स्वादिष्ट असतात. पण याच मसालेदार पदार्थांमध्ये व्हिनेगर आणि मीठाचे प्रमाण जास्त असते. यामुळे तुमचा घसा खवखवतो आणि घशातील सूजही वाढू शकते. खोकला किंवा सर्दी असेल तर मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह टाळावा.
प्रोसेस्ड फूड
सर्दी-खोकल्या मध्ये प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने तुमची तब्बेत बिघडू शकते. बऱ्याचदा रेडी टू इट अन्न खाल्ल्याने शरीराला त्रास होतो. कारण, असे पदार्थ फ्रेश नसतात. तसेच, काही पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. यामध्ये मीठ आणि चरबीची मात्रा अधिक प्रमाणात असू शकते. अशाने फास्टफूड शरीरात सूज वाढवून तुमचे शरीर निरोगी होण्याची प्रक्रिया मंदावते. शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असल्याास स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक, सॉसेजेस या सर्व पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर
- Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha