मुंबई : मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आलेली कोरोनाची दुसरी लाट ही अधिक घातक स्वरुपाची दिसत आहे. ठिकठिकाणी वाढती रुग्णसंख्या हा धोका स्पष्टपणे दाखवत आहे. अशा परिस्थितीमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जात आहे. काही नैसर्गिक घटांकांच्या सेवनानं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास हातभार लावला जातो. दिवसभरातील कामांमुळं आलेला थकवा आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी तुम्हीही घरच्या घरी बनवू शकता, घरच्या घरी 'ही' सोपी पेय... 


Tata Steel | सेवेत तत्पर! टाटा स्टीलकडून कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दर दिवशी 300 टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा 


हळद, आलं आणि अॅपल सायडर व्हिनेगरचं पेय- शरीरातील रोगप्रतिकाक शक्ती वाढवण्यासाठी सकाळी उठून आलं आणि त्यापासून तयार करण्यात आलेली पेय पिणं कधीही उत्तम. हळद आणि आल्यामध्ये असणारे काही गुण दिवसभर तुमच्या शरीरात असणारी रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यास मदतीची ठरतात. हे पेय बनवण्यासाठी ¼ कुटलेलं आलं, ¼ चमचा हळद, 1 चमचा अॅपल सायडर विनेगर आणि चवीनुसार मध या गोष्टींची गरज आहे. 


हे पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये आलं आणि हळद टाकून 5 ते 10 मिनिटांसाठी हे मिश्रण उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करुन हे मिश्रण गाळून घ्या. हलकंसं थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध आणि अॅपल सायडर विनेगर मिसळून हे पेय प्या. 


ओवा, तुळस आणि काळ्या मिरीपासून बनलेलं पेय - हे पेय बनवण्यासाठी अर्धा चमचा ओवा, 5-6 तुळशीची पानं, अर्धा चमचा काळी मिरी आणि 1 चमचा मध या गोष्टींची गरज आहे. 


या पेयासाठी एक ग्लास पाणी घ्या. यामध्ये तुळशीची पानं, काळीमिरी पूड, ओवा टाकून हे मिश्रण 5 मिनिटांसाठी उकळून घ्या. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये मध मिसळून हे पेय प्या. कफची समस्या सतावत असेल तर तुम्हाला यामुळे आराम मिळेल. पोटाच्या आरोग्यासाठीसुद्धा हे पेय लाभदायक आहे. 


गुळवेल, लवंग आणि लिंबापासून बनलेलं पेय- हे पेय बनवण्यासाठी 5 लवंग, 6-7 तुळशीची पानं, 1 चमचा आलं, 1 कप गुळवेलीचा रस, 2 चमचे लिंबाचा रस आणि चवीनुसार काळं मीठ या साहित्याची गरज आहे. 


हे पेय बनवण्यासाठी 1 कप पाणी 5 मिनिटं उकळवून त्यामध्ये 1 कप गुळवेलीचा रस मिसळा. चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस त्यात मिसळा. त्याचवेळी या मिश्रणात लवंग आणि तुळशीची पानंही घाला. थोड्या वेळानं मिश्रण थंड झाल्यावर ते प्या.