Hair Care Tips : केसांचं आरोग्य जपण्यासाठी आजकाल प्रत्येक जण खूप मेहनत घेताना पाहायला मिळतं. हेअर स्पा, हेअर मास्क, ऑयलिंग यासाठी अनेक जण महागडे प्रोडक्ट्स वापरताना पाहायला मिळतात. मात्रा केसांची काळजी घेताना काही मूळ गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. केसांची काळजी घ्यायची असेल. तर केस धुणे आणि केस सुकवण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. अनेक जण केस धुतल्यानंतर केसांना लगेचच टॉवेल गुंडाळून ठेवतात, यामुळे केस सुकतात आणि केसांमधील पाणीही अंगावर गळत नाही. पण ही सवय खूप नुकसानदायक आहे. यामुळे तुमच्या केसांना नुकसान पोहोचतं. ओल्या केसांना टॉवेल गुंडाणळ्याच्या सवयीचे दुष्परिणाम जाणून घ्या.


केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'या' सवयी बदला (Common Showering and Bathing Mistakes)


1. ओल्या केसांना टॉवेल गुंडाळू नका (Do Not Wrap Towel Around Wet Hair)


आंघोळीनंतर ओल्या केसांना टॉवेल गुंडाळल्याने केस खराब होतात. यामुळे तुमचे केस कमकुवत होऊन केस गळती होते. केस ओले असताना फार नाजूक असतात. अशावेळी केसांना टॉवेल गुंडाळल्याने केसांचं टॉवेलसोबत घर्षण होतं. यामुळे केस तुटतात. त्याशिवाय यामुळे केसांची चमकही कमी होते.


2. केस रुक्ष होतात (Hair Becomes Dull)


आंघोळीनंतर डोक्यावर टॉवेल गुंडाळल्याने केस टॉवेलसोबत घासले जातात. यामुळे केस रुक्ष किंवा कोरडे होऊ शकतात. कारण जास्त वेळ केसांना टॉवेल बांधून ठेवल्यास केसांमधील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस खूप कोरडे होतात.


3. चेहऱ्यावर टॉवेल घासू नका (Do Not Rub Towel On Face)


चेहऱ्यावर टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेचं नुकसान होतं. चेहऱ्यावर टॉवेल घासल्यानं त्वचेच्या पेशींचं नुकसान होतं. त्यामुळे चेहऱ्यावर टॉवेल रगडण्याची सवय सोडून द्या. चेहरा कोरडा करताना हळूवारपणे चेहऱ्यावर पुसावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :