पॅरिसः तुम्ही कॉफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. तसंच चांगली बातमी देखील आहे. कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सांगितलं आहे.

 

 

कोणतंही पेय 65 डिग्री पेक्षा जास्त गरम असेल तर त्याने कॅन्सर होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलं. आहे. कॉफी ही आरोग्यास हानिकारक नाही, मात्र अधिक गरम असल्यास कॅन्सरची शक्यता असल्याचं समोर आलं आहे.

 

 

कॅन्सरवर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय एजन्सी आयएआरसी या संस्थेने देखील कॉफी जास्त गरम असल्यास कॅन्सर होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला होता.

 

 

चीन, ईराण, तुर्की, दक्षिण अमेरिका या ठिकाणी हे संशोधन करण्यात आलं. या ठिकाणी कॉफी जवळपास 70 डिग्री पर्यंत गरम केली जाते. त्यामुळे येथे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते, असं आयएआरसीने सांगितलं.