Christmas 2023 Gift Ideas : नाताळचा (Christmas 2023) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ख्रिश्चन धर्माशी संबंधित हा सण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतातही ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक चर्चमध्ये जातात. विविध शहरांमध्ये अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. लोक आपल्या घरी चविष्ट पदार्थ बनवतात. घरी मित्र-मंडळी, पाहुण्यांना आमंत्रित करतात.


ख्रिसमसचा उल्लेख करताच, पहिली गोष्ट जी मनात येते ती म्हणजे सांताक्लॉज आणि त्याच्या भेटवस्तू. आजकाल अनेक ठिकाणी ऑफिसमध्ये सुद्धा सिक्रेट सांता सेलिब्रेट करतात. यामध्ये लोक सिक्रेट सांता बनून चिठ्ठीत आलेल्या व्यक्तीला भेटवस्तू देतात. अशा वेळी जर तुम्हीसुद्धा यंदा सिक्रेट सांता होऊन ऑफिसला जाणार असाल तर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसाठी सिक्रेट सांता बनून हा दिवस खास बनवू शकता. या ठिकाणी आम्ही तुम्हाला ऑफिस फ्रेंड्ससाठी काही बजेट फ्रेंडली गिफ्ट आयडिया देणार आहोत. ज्या तुम्ही फॉलो करू शकता.  


वूलन कॅप 


हिवाळा सुरू आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्याला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी वूलन कॅप भेट म्हणून देऊ शकता. यामुळे त्यांचं थंडीपासून संरक्षण देखील होईल आणि तुमची त्यांच्याप्रती असलेली काळजी देखील दिसून येईल.  


रंगीत नोटपॅड


ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसाठी नोटपॅड खूप उपयुक्त आहेत. तुमच्या सहकाऱ्यांना महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी त्यांना ख्रिसमसला रंगीबेरंगी नोटपॅड्स भेट देऊ शकता. ते या नोटपॅडवर महत्त्वाची माहिती टिपू शकतात आणि डेस्कवर पेस्ट करू शकतात.


लंच बॅग


तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना एक छानशी लंच बॅग गिफ्ट म्हणून देऊ शकता. ही बॅग फारच उपयुक्त देखील ठरेल त्यामुळे सहकारीही खुश होतील. त्यामुळे लंच बॅगचा ऑप्शन तुमच्यासाठी उत्तम आहे.    


बॅग


कर्मचाऱ्यांना हलक्या वजनाच्या बॅग लागतात. पुस्तकांपासून ते कपड्यांपर्यंत सर्व काही सहजपणे टोट बॅगमध्ये ठेवता येते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना ख्रिसमसच्या दिवशी टोट बॅग भेट देऊ शकता.


फोटो फ्रेम


तुमच्या जवळच्या आणि खास लोकांबरोबर घालवलेल्या क्षणांच्या आठवणी जतन करण्याचा फोटो हा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही तुमच्या सहकार्‍यांना एक छोटी फोटो फ्रेम भेट देऊ शकता, ज्यामध्ये तुमच्या ऑफिसमधील गोड आठवणी असतील. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


New Year 2024 : नवीन वर्षात 'हे' संकल्प केले तर तुमचं आयुष्य बदलेल! सकारात्मक आयुष्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स