Christmas 2022 Gift : ख्रिसमस निमित्त (Christmas 2022)  25 डिसेंबरला सांताक्लॉज (Santa Claus) लवकरच येणार आहे. तुम्हालाही कोणाचा 'सिक्रेट सांता' (Secret Santa) बनायचं असेल, तर तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना प्रेम दाखवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. या ख्रिसमसमध्ये तुम्ही तुमचे बॉस, सहकारी, कुटुंब किंवा मित्रांचे गुप्त सांता होऊ शकता. यासाठी केवळ 500 रुपयांपर्यंत बजेट गिफ्ट्सची यादी जाणून घ्या


बजेट फ्रेंडली सीक्रेट सांता गिफ्ट 



सुगंधित मेणबत्त्या
नैसर्गिक वस्तू आणि सुगंधित तेलांनी बनवलेल्या मेणबत्त्या भेट म्हणून देण्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.


प्लॅनर आणि डायरी
डायरीमध्ये काही रोज जणांना लिहायला आवडते. अशा लोकांना प्लॅनर किंवा डायरी भेट दिली जाऊ शकते.


3D Wooden Christmas Ornament
त्याची किंमत 499 रुपये आहे. महिलांना ही भेट खूप आवडू शकते. ही एक थ्रीडी वूडन ओरनामेंट आहे. ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.


परफ्यूम
परफ्यूम कधीही आऊट ऑफ स्टाइल होत नाही. परफ्यूम कोणाला आवडणार नाही असं कोणीही नसेल. परफ्यूम बॉक्समध्ये एक सुंदर नोट ठेवल्याने कोणाचाही दिवस उत्तम बनवला जाऊ शकतो.


ख्रिसमस ट्री लाइट
या एलईडी लाईट्समध्ये लहान ख्रिसमस ट्री लावले आहेत. यामुळे ख्रिसमससाठी ही एक अद्भुत भेट आहे. त्याची किंमत रु.279 आहे.


कस्टमाइज्ड कोस्टर
वेगवेगळ्या डिझाइनचे क्रिएटिव्ह कोस्टर भेट म्हणून दिले जाऊ शकतात.


स्किन केयर हॅम्पर
हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. इको-फ्रेंडली त्वचेची निगा आणि केसांची निगा यांसारख्या भेटवस्तू कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी पुरेशा आहेत.


ख्रिसमस स्नोफ्लेक लाइट
अॅमेझॉनवर त्याची किंमत 249 रुपये आहे. हे दिवे बर्फासारखे दिसतात. यामुळे, ते ख्रिसमससाठी सर्वोत्तम भेट बनू शकते


मल्टीकलर एलईडी फेयरी स्ट्रिंग लाइट 
त्याची किंमत रु.350 आहे. त्याची लांबी 20 मीटर असून त्यात 48 एलईडी दिवे देण्यात आले आहेत. आपण त्यांच्याबरोबर ख्रिसमस ट्री सजवू शकता.


लँटर्न मल्टीकलर
अॅमेझॉनवर या दिव्यांची किंमत फक्त 350 रुपये आहे. त्याची लांबी 11 फूट आहे. कंदिलाच्या डिझाइनमध्ये 16 दिवे आहेत. LED सह येणारे हे दिवे घराला प्रकाश देतात.


इतर बातम्या


Christmas Cake History : ख्रिसमसच्या दिवशीच केक का कापतात? वाचा रंजक इतिहास