Fashion : पार्टी म्हटलं की जो तो काहीतरी वेगळं आऊटफिट्स ट्राय करत असतो, कारण सर्वांपेक्षा वेगळं आणि हटके दिसायचं असेल, तर फॅशनमध्ये विविधता आणली जाते. पार्टी कुठलीही असो, तुमचा आउटफिट परफेक्ट असायला हवा. मुली यासाठी खूप तयारी करतात, पण अनेक वेळा तुम्ही तेच तेच कपडे घालून कंटाळला असाल, तर काहीतरी नवीन करण्याचा विचार केला जातो, पण अशा वेळेस तुम्हाला समजत नाही की कोणता आउटफिट घालू? त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी केप ड्रेसचे काही पर्याय घेऊन आलो आहोत. आता तुम्ही पार्टीमध्ये विविध स्टाईलचे केप ड्रेस घालू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला काही केप ड्रेसेस दाखवणार आहोत, जे तुम्ही पार्टीमध्ये परिधान करू शकता आणि या केप ड्रेसमध्ये तुमचा लुक छान दिसेल. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला हे कपडे मिळतील.
फ्लोरल केप ड्रेस
जर तुम्ही हलक्या रंगात काहीतरी शोधत असाल तर तुम्ही या प्रकारचा पिवळ्या रंगाचा फ्लोरल केप ड्रेस घालू शकता. या ड्रेसमध्ये पिवळ्या फ्लोरल प्रिंट आणि केप स्लीव्हज आहेत. हा ड्रेस पार्टीसाठी योग्य पर्याय आहे. तुम्हाला या प्रकारचे ड्रेस अनेक पर्यायांमध्ये मिळतील जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता आणि हे कपडे तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफिसमध्ये मिळतील.
सिल्क केप ड्रेस
जर तुम्ही डार्क रंगात काहीतरी शोधत असाल तर तुम्ही हा काळ्या रंगाचा केप ड्रेस निवडू शकता. या प्रकारचा ड्रेस हा पार्टीसाठी सर्वोत्तम पर्याय असला तरी तुम्ही हा ड्रेस डे पार्टीमध्येही घालू शकता. हा ड्रेस साधा असून सिल्कचा असून हीच या ड्रेसची खासियत आहे. या प्रकारचा ड्रेस तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकता.
स्लीव्हलेस केप ड्रेस
जर तुम्हाला निळा रंग आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ड्रेस देखील घालू शकता. हा ड्रेस देखील फ्लोरल केप ड्रेस आहे आणि तुम्ही हा ड्रेस पार्टी दरम्यान घालू शकता. तुम्हाला या प्रकारचे ड्रेस बाजारात सहज मिळतील आणि तुम्ही या प्रकारचे ड्रेस ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Fashion : एक तर उन्हाळा, त्यात लग्नाचा सीझन, 'Dont Worry!' कूल दिसण्यासाठी लेहेंग्याच्या डिझाईन्स एकदा पाहाच...