Health Tips : आजच्या धावपळीच्या काळात आपण इतके बिझी झालो आहोत की आपल्या तब्येतीकडे आपण अगदी सहजपणे दुर्लक्ष करतो. निरोगी शरीरासाठी तुमचा आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही काय खाता, किती प्रमाणात खाता, कोणत्या वेळी खाता या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आहार म्हटलं की, सकाळचा नाश्ता हा आलाच. तुम्ही जर सकाळचा अगदी भरपेट नाश्ता केला तर तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. काम करण्याची ऊर्जा मिळते. पण अनेकदा कामाच्या धावपळीत हा नाश्ता विसरतो. ऑफिसला जाण्यासाठी प्रवास करावा लागतो त्यामुळे शरीर लवकर थकतं. याचं मुख्य कारण सकाळी नाश्ता न करणं. यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.
सकाळचा नाश्ता कॅन्सरपासून बचावासाठी महत्त्वाचा
खरंतर, एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जी व्यक्ती सकाळी नाश्ता करते, त्या व्यक्तीला कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. कॅन्सर हा असा आजार आहे, ज्यामुळे जगभरात लाखो लोक मरतात. भारतातही मोठ्या प्रमाणात लोक या आजाराला बळी पडतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने वेळेवर नाश्ता केला तर त्याला कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. यासोबतच तो अनेक आजारांपासूनही सुरक्षित राहतो.
अभ्यासात काय म्हटले होते?
अभ्यासानुसार, जर एखाद्या व्यक्तीने नाश्ता केला नाही तर त्याची संसर्गाशी लढण्याची शक्ती कमी होते. यामुळे व्यक्ती हृदयविकारापासून कर्करोगापर्यंतच्या आजारांना बळी पडू शकते. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असे सांगण्यात आले की, नाश्ता न केल्याने मेंदूमध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया होतात, ज्याचा रोगप्रतिकारक पेशींवर नकारात्मक परिणाम होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :