Weight Loss Diet : वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) तुम्हाला ब्रेकफास्ट (Breakfast), लंच (Lunch) आणि डिनर  (Dinner) च्या वेळांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. योग्य वेळेत जर तुम्ही जेवण केले तर तुमचे वजन जास्त वाढणार नाही. जाणून घेऊयात जेवणाची योग्य वेळ  


झोप आणि जेवण यांच्यामध्ये ठेवा तीन तासांचे अंतर- 
न्यूट्रिशन एक्सपर्ट्सनुसार जेवणानंतर तुमचे शरीर जेवढ्यावेळ अॅक्टिव्ह राहते तेवढ्या वेळात तुमच्या कॅलरीज बर्न होतात. कॅलरीज बर्न झाल्या नाहित तर शरीरात फॅट्सचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे झोप आणि जेवणामध्ये तीन तासांचे अंतर ठेवावे. रात्री उशीरा जेवण केल्याने वजन वाढते. गोड पदार्थ, साखरचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणं टाळावं. त्यामुळे शरीरातील कॅलरी कमी होतात. फॅट कमी करण्यासही मदत होते. तसेच पालेभाज्या आणि फळांचे योग्य प्रमाणात सेवन करावं. कारण यात फायबर असल्यामुळं आपल्या वाढलेल्या कॅलरिज कमी करण्यास मदत होते. 


सात ते आठ वाजता करा जेवण 
वजन कमी करायचं असेल तर रात्रीचे जेवणं सात ते आठ या दरम्यान करावे. यामुळे पचन चांगले होते. त्यामुळे वजन देखील कमी होते.


दररोज व्यायाम करणं, योगाभ्यास, चालणं, धावणे हे सर्व केल्यानं वाढतं वजन झटपट कमी होण्यात मदत होते आणि आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते.  


शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवा
पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते. 


Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात तुमच्या आहारात करा 5 बदल, झटपट कमी होईल वजन


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


Tea Side Effects: दिवसातून चार कप चहा पिताय? तर सावधान, होऊ शकतं नुकसान