Honeymoon Places in India : लग्नानंतर प्रत्येक जोडप्यासाठी (Couples) हनिमून (Honeymoon) खूप खास असतो. आजकाल लोक हनिमूनसाठी परदेशात लंडन, सिडनी, बँकॉक सारख्या ठिकाणी जाण्याची क्रेझ खूप वाढली आहे. ही ठिकाणे खूप महाग आहेत, पण लोक या हनिमून डेस्टिनेशन्सला भेट देण्याचा मोह आवरत नाहीत. जर तुम्हीही हनिमून डेस्टिनेशन शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी हनिमून डेस्टिनेशनसाठी सर्वोत्तम आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही ठिकाणे तुमच्या बजेटमध्ये बसतील. हनिमूनसाठी या डेस्टिनेशन्स तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी एक उत्तम आणि अविस्मरणीय अनुभव असेल.


परदेशात जाण्याची अनेकांची इच्छा असते, पण भारतातही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जाऊन तुम्हाला परदेशातील ठिकाणांचा विसर पडेल. भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे भेट दिल्यानंतर तुम्हाला परदेशात गेल्यासारखं वाटेल. भारतातील सर्वोत्तम आणि बजेट फ्रेंडली हनिमून डेस्टिनेशनबद्दल जाणून घ्या.


जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir)


बर्फाच्छादित पर्वत, हिरवेगार सुंदर दऱ्या, सुंदर तलाव, या सर्व प्रेक्षणीय स्थळांमध्ये जोडीदारासोबत वेळ घालवणे म्हणजे जणू स्वर्गच. भारताचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणारं जम्मू-काश्मीर हनिमूनसाठी उत्तम डेस्टिनेशन आहे. तुम्ही हनिमूनचा प्लान करत असाल तर, जम्मू-काश्मीरमध्ये येऊन तुम्ही दल लेक, गुलमर्ग, पहलगाम सारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.


केरळ (Kerala)


जर तुम्ही लग्नानंतर हनिमून प्लॅन करत असाल तर तुमच्या सर्वोत्तम डेस्टिनेशनच्या यादीत केरळचा समावेश नक्की करा. तुमच्या लाइफ पार्टनरसोबत केरळमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. नैसर्गिक सौंदर्यासोबतच केरळमध्ये वैदिक स्पा, ट्री हाऊस अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.


गोवा (Goa)


ज्यांना हनिमूनसाठी परदेशात गेल्यासारखा फिल हवा असेल तर, हनिमूनच्या ठिकाणांच्या यादीत गोवा पहिल्या क्रमांकावर येतो. नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी गोव्याला कायम प्राधान्य देतात. बीचवर आपल्या जोडीदारासोबत सुंदर सनसेट पाहण्याचा अनुभव काही औरच आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत साहसी खेळही खेळू शकता. हा अनुभव जोडप्यांसाठी रोमँटिक आणि अॅडव्हेंचेरस ठरेल.


माउंट अबू (Mount Abu)


राजस्थानचे नंदनवन म्हटल्या जाणार्‍या माउंट अबू हे हनिमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. हे जणू भारतातील हिडन जेम आहे, असं म्हणावं लागेल, कारण येथील निसर्ग सौंदर्य मनाला भूरळ पाडते. माउंट अबू हे जास्त वर्दळ नसलेलं बेस्ट हनिमून डेस्टिनेशन आहे. हे जोडप्यांसाठी सर्वोत्तम रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. आजूबाजूची हिरवाई आणि डोंगर आणि सुंदर तलाव यामुळे तुमचा हनिमून अविस्मरणीय ठरेल. जोडीदाराच्या हातात-हात घालून सूर्यास्ताच्या वेळी आकाशाच्या बदलत्या रंगछटा पाहण्याचा अनुभव वेगळाच ठरेल.