How to Identify Real and Fake Red Chilli Powder: लाल तिखट पावडर आपण रोजच्या जेवण्यामध्ये वापरतो. भाजी किंवा इतर पदार्थ तिखट बनवण्यासाठी लाल तिखटाचा वापर केला जातो. काही लोक लाल  मिर्चीचीची पावडर बनवून घरीच लाल तिखट तयार करतात. तर काही लोक तिखट विकत आणतात. विकत आणलेल्या तिखटामध्ये अनेक वेळा रंग मिसळला जातो. रंग असलेली भेसळयुक्त लाल तिखट पावडर  ओळखण्याची सोपी पद्धत FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून सांगितली आहे. 


काही वेळा रंग, विटांची पावडर ही लाल तिखटामध्ये टाकली जाते. अशी भेसळयुक्त लाल तिखट पावडर  खाल्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात कशी ओळखायची भेसळयुक्त लाल तिखट पावडर-






भेसळयुक्त लाल तिखट पावडर ओळखण्याची सोपीपद्धत 
1 एका ग्लासमध्ये पाणी घ्या 
2. त्यामध्ये एक चमचा लाल तिखट पावडर टाका 
3 पाण्यामधून थोडी पावडर काढून हाताला लावा 
5 हातावर तुम्हाला रंग जाणवेल 
6 जर तुम्हाला या पावडरमध्ये साबणासारखा चिकटपणा जाणवत असेल तर त्यामध्ये साबण मिसळा आहे. 
अशा प्रकारे तुम्ही भेसळयुक्त लाल तिखट पावडर ओळखू शकता.


Health Care Tips: चहामध्ये साखरे ऐवजी करा गुळाचा वापर; जाणून घ्या फायदे


FSSAI म्हणजेच  भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण विभाग सोशल मीडियावर  भाज्या तसेच खाण्याचे पदार्थ यांमधील भेसळ कशी ओळखावी याबाबत सोशल मीडियाद्वारे नेहमी माहिती देत असतात. वेगवेगळ्या व्हिडीओद्वारे भेसळयूक्त पदार्थ ओळखणाच्या घरीच करता येतील अशा पद्धती ते लोकांना सांगतात. तसेच FSSAI सोशल मीडियाद्वारे आरोग्य आणि आहार या विषयांवरील पोस्ट देखील शेअर करतात. काही दिवसांपूर्वी FSSAI  भेसळयुक्त भाज्यांविषयीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता.