Beauty Tips : नोकरदार महिलांना घराबरोबरच ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. काही वेळा आपल्या कामाच्या बिझी शेड्युलमुळे अनेक गोष्टी आठवून बॅगेत ठेवणं फार कठीण काम असतं. बर्‍याच वेळा सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी नीट तयारी करायला वेळ मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करता तेव्हा स्वत:ला नेहमीच अपडेट राहणं गरजेचं आहे. तुम्हालाही काम आणि घरच्या जबाबदाऱ्या दरम्यान तयार होण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही ऑफिसला अगदी आत्मविश्वासाने जाऊ शकता.

  


अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या बॅगमध्ये काही महत्त्वाची मेकअप प्रोडक्ट्स तुमच्या बरोबर ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही ते अगदी सहजपणे वापरू शकता. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या 4 गोष्टी सांगणार आहोत ज्या प्रत्येक वर्किंग महिलांकडे असणं गरजेचंच आहे.


बीबी क्रीम


अनेकदा ऑफिसला जाताना फार घाई गडबड असते. अशा वेळी जर तुम्ही घरी तुमच्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर किंवा कोणतीही चांगली क्रीम लावायला विसरला असाल तर तुम्ही तुमच्या बॅगेत ठेवलेली बीबी क्रीम वापरू शकता. हे पूर्णपणे मॉइश्चरायझरचे काम करते. याबरोबरच ते तुमच्या त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासूनही वाचवते.


कन्सिलर 


अनेक वेळा चेहऱ्यावरचे पिंपल्स किंवा चेहऱ्यावरील डागांमुळे आपल्या चेहऱ्याचं संपूर्ण सौंदर्य निघून जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम वापरूनही चेहऱ्यावरचे डाग लपत नाहीत. अशा वेळी तुम्ही चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी कन्सिलरचा वापर करू शकता. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की, चेहऱ्यावरच्या ज्या ठिकाणी डाग असतील तिथेच कन्सिलरचा वापर करा.  


लिपस्टिक


तुम्ही बाहेर फिरायला जा किंवा ऑफिसला जा तुमचा लिपस्टिक शिवाय तुमचा लूक पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या बॅगमध्ये लिपस्टिकच्या अनेक शेड्स ठेवू शकता. आवश्यक असल्यास, तुम्ही मॅट किंवा ग्लॉसी लिपस्टिक वापरू शकता. तुम्ही लिपस्टिकचा वापर ब्लश म्हणूनही करू शकता. लिपस्टिकच्या त्या शेड्स वापरा ज्या ओठांवर दीर्घकाळ टिकतील. याशिवाय दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी तुम्ही तुमच्या बॅगमध्ये पॉकेट परफ्यूम देखील ठेवू शकता. यासाठी तुम्ही लॉंग लास्टिंग मिंट देखील वापरू शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी