Hairfall Tips : आजकाल अनेकांना केसगळतीचा त्रास होतो. या समस्येने पुरुष आणि महिला दोघेही त्रस्त आहेत. परंतु, तरीही महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. अनेक वेळा केस नियमित धुतल्यानंतरही घाण, तेल, घाम आणि केसांची निगा राखणारी उत्पादने टाळूवर चिकटून राहतात, त्यामुळे केसांमध्ये कोंडा, खाज सुटणे तसेच केस गळणे अशी समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत केसगळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी कोणती उत्पादने टाळली पाहिजेत, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया अशाच काही गोष्टींबद्दल...
अमोनियायुक्त उत्पादने
केसांना कलर करणे आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे. हेअर कलरद्वारे केसांना अनेक रंग छटा दिल्या जाऊ शकतात. परंतु हे देखील खरे आहे की, हेअर कलर पुन्हा पुन्हा करणे केसांसाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत केसांना रंग देणारी उत्पादने निवडताना रंगाच्या पॅकेटवर ती अमोनिया असलेली उत्पादने आहेत की, अमोनियामुक्त उत्पादने आहेत हे निश्चितपणे तपासा.
कृत्रिम रंग
आजकाल अनेक स्त्रिया केसांना कलर करतात. विशेषत: मुलींना केस रंगवायला आवडतात. पण, तुम्हाला माहित आहे का की, अनेक कृत्रिम रंगांमध्ये एक नाही तर अनेक रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे केस गळणे सुरू होते.
पॅराबेन उत्पादने
पॅराबेन हे एक असे रसायन आहे, जे एक नाही तर अनेक कॉस्मेटिक वस्तू बनवण्यासाठी वापरले जाते. हे एक रसायन आहे, ज्याच्या मदतीने उत्पादनांचे आयुष्य वाढवले जाते. अशा परिस्थितीत, तुम्ही जास्त प्रमाणात पॅराबेन केमिकल वापरणे टाळले पाहिजे, ते शॅम्पू किंवा इतर केसांच्या काळजी उत्पादनांमध्ये आढळते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
- Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha