Apple Tea Benefits : ॲपल टी (Apple Tea) अलिकडच्या काळात फार लोकप्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. ॲपल टी अतिशय गुणकारी आहे. ॲपल टीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आरोग्याच्या संदर्भातील अनेक समस्या ॲपल टीच्या सेवनामुळे दूर होतील. तुम्हीही हा ॲपल टी एकदा नक्कीच ट्राय करा. ॲपल टी म्हणजेच सफरचंदाचा चहा फार आरोग्यादायी आहे. ॲपल टी पिण्याचे फायदे आणि ॲपल टी बनवण्याची पद्धत जाणून घ्या.
1. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
गरमागरम ॲपल टी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सोपा उपाय आहे. ॲपल टीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. ॲपल टीमुळे शरीरातील चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
2. मधुमेहींसाठी गुणकारी
ॲपल टीमध्ये शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम करणारे घटक असतात. त्यामुळे, ॲपल टी पिणे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
3. हाडांचे आरोग्य सुधारते
यामध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे सी आणि सोडियम असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
4. हृदयाचे आरोग्य सुधारते
ॲपल टी शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते, यामुळे रक्तदाब कमी होतो. नियमितपणे ॲपल टी प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
5. रोगप्रतिकार शक्ती वाढवते
ॲपल टीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. ॲपल टीमुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. यामुळे अनेक प्रकारचे रोग आणि संक्रमणांशी लढण्यास मदत करते.
6. बद्धकोष्ठता दूर होते
ॲपल टी प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
7. दृष्टी सुधारते
ॲपल टीमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स वयानुसार दृष्टीचे संरक्षण करून डोळ्यांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात.
ॲपल टी कसा तयार करायचा?
एका पातेल्यात आधी चार कप पाणी घ्या. पाणी उकळल्यावर त्यामध्ये किसलेले सफरचंद, लिंबू आणि चवीनुसार साकर मिसळा. यामध्ये तुम्ही साखरेऐवजी मध देखील वापरू शकता. यानंतर हा चहा तीन मिनिटे उकळवा आणि यामध्ये दोन ग्रीन टी बॅग टाका. ग्रीन टी बॅग पाच मिनिटे राहू द्या. त्यानंतर हा चहा गाळून गरमागरम सर्व्ह करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.