Apollo 11 : अपोलो 11 च्या अंतराळवीरांना चंद्रावरून परतल्यानंतर कस्टम फॉर्म भरावा लागला होता, माजी अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांनी त्यांच्या Twitter अकाऊंटवर, 24 जुलै 1969 रोजी अपोलो 11 अंतराळातून परतल्यानंतर, कस्टम फॉर्मचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये अवकाशात 8 दिवस आणि चंद्रावर 22 तास घालवल्यानंतर, तीन अंतराळवीर- नील आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलिन्स आणि स्वतः पृथ्वीवर परतल्यावर त्यांना कस्टम फॉर्म भरावा लागला.


"पृथ्वीवर परत येण्यासाठी या औपचारिकतेतून जावे लागेल!" 
अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांनी एक कस्टम फॉर्म शेअर केला होता, जो चंद्रावरून पृथ्वीवर परत आल्यानंतर त्यांना भरावा लागला. हो, हे खरं आहे. नील आर्मस्ट्राँगनंतर आल्ड्रिन चंद्रावर चालणारे दुसरे व्यक्ती आहेत, ही घटना 20 जुलै 1969 रोजी घडली. NASA चे दोन अंतराळवीर हे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण करणारे आणि चंद्रावर उतरणारे पहिले पुरुष बनले. दरम्यान, या कस्टम फॉर्मची माहिती जगाला देताना आल्ड्रिनने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ते म्हणाले “ आम्हाला कल्पनाही नव्हती, अंतराळात आठ दिवस आणि चंद्रावर 22 तास घालवल्यानंतर, पृथ्वीवर परत येण्यासाठी या औपचारिकतेतून जावे लागेल! 






 


 


काय लिहलंय कस्टम फॉर्ममध्ये? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल


फॉर्मवरील तपशीलानुसार, अर्ज दिनांक 24 जुलै 1969 चा आहे आणि त्याचे शीर्षक आहे “जनरल डिक्लरेशन” फॉर्ममध्ये आर्मस्ट्राँग, आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांच्याविषयी तपशीलांसह अपोलो 11 स्पेसशिपबद्दल माहिती आहे. फॉर्ममध्ये होनोलुलुमध्ये अपोलो 11 चे लँडिंग आणि ‘मून रॉक आणि मून डस्ट सॅम्पल’ सारख्या कार्गोचा समावेश होता, जो टीम आणि स्पेसक्राफ्टसह परत आला होता. हा फॉर्म सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, पोस्ट व्हायरल झाली आहे आणि सध्या युझर्सकडून हजारो प्रतिक्रिया येत आहेत. ट्विटर वापरकर्त्यांनी हे देखील लक्षात घेतले की, सीमाशुल्क फॉर्ममध्ये एक बाब समाविष्ट आहे, जेथे तीन प्रसिद्ध अंतराळवीरांची तपासणी केली जाईल, तसेच त्यांनी त्यांच्यासोबत अंतराळातून आणलेल्या आजारांसाठी तपासले जाईल.


 




 


NASA द्वारे पडताळणी


Space.com च्या अहवालानुसार, हा फॉर्म 2009 मध्ये यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला होता. अपोलो 11 मिशनच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त श्रद्धांजली म्हणून हा फॉर्म शेअर करण्यात आला होता आणि NASA द्वारे त्याची पडताळणी करण्यात आली होती. यावर नासाचे प्रवक्ते जॉन येमब्रिक म्हणाले, "होय, तो खरा फॉर्म आहे." त्यावेळी हा थोडा विनोद होता, असे सांगत त्यांनी स्पष्टीकरणही दिले


अंतराळवीरांच्या स्वाक्षऱ्या दिसू शकतात


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फॉर्ममध्ये, प्रतिष्ठित अपोलो 11 मिशन अंतराळवीरांच्या स्वाक्षऱ्या दिसू शकतात. 'कृषी, सीमाशुल्क, इमिग्रेशन आणि पब्लिक हेल्थ' या कॅटेगरीनुसार फॉर्म भरण्यात आला असून यात 'चंद्रावरून प्रस्थान आणि होनोलुलू, हवाई, यूएसए येथे 'आगमन' असे लिहिले आहे. दरम्यान, अंतराळवीर पृथ्वीवर परत आल्यावर त्यांच्यासोबत चंद्रावरील खडक आणि धुळीचे नमुने होते.


संबंधित बातम्या>


NASA : चंद्रावरुन आणलेल्या मातीत लावलं रोप, पुढे 'जे' घडलं ते पाहून नासाचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित!