Amazon Great Indian Festival Sale 2021 :अ‍ॅमेझॉनच्या वार्षिक अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीवल सेल्सची अनेक लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आता ही प्रतीक्षा संपली असून 4 ऑक्टोबरपासून हा सेल सुरू होणार आहे. या सेलचे वैशिष्ट्य असे की, अॅमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी हा सेल एक दिवस अगोदरच सुरू होणार आहे. म्हणजे अॅमेझॉन प्राईम मेंबरर्सला या सेलमध्ये 3 ऑक्टोबरपासून खरेदी करता येणार  आहे.



 ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने माहिती दिली की, अॅमेझॉन GIF 2021 विशेषकरून लाखो छोटे विक्रेत्यांना समर्पित केले आहे. यामध्ये 450 शहरातील 75 हजारांपेक्षा अधिक स्थानिक दुकानदारांता समावेश आहे. आज भारतातील लाखो छोटे विक्रेते आणि दुकानदारांचे हित जपणे ही आमची प्राथमिकता आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलवर खरेदी करण्याची संधी सर्वात अगोदर प्राईम मेंबर्सला देण्यात येणार आहे.


यंदा Amazon Great Indian Festival Sale 2021 मध्ये सॅमसंग, वन प्लस, शाओमी, सोनी, अॅपल, बोट, लेनोवो, एचपी, आसुस, बीबा, अॅलन सॉली, अॅडिदास आदी  ब्रॅडने हजारापेक्षा अधिक नवीन उत्पादने लॉन्च केली आहे. या वर्षीच्या सेलचे  वैशिष्ट्य म्हणजे इथे  ग्राहकांना  असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये देखील अनेक उत्पादने आहे. एवढंच नाही तर सणासुदीच्या काळात अॅमेझॉन अनेक नवे प्रोडक्ट देखील लॉन्च करणार आहे. होम अ‍ॅण्ड किचन, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेसरीज, ग्रॉसरी, फॅशन आणि ब्युटी,, टीव्ही आणि अप्लायंसेस, ग्रॉसरी, बुक्स अ‍ॅण्ड गेमिंग अशा विभागांचा समावेश आहे.