Weight Loss Tips : वाढत्या वजनामुळे अनेकजण त्रस्त असतात. अशा लोकांना वजन कमी तर करायचं असतं पण त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तर, या संदर्भात मेडिकल एडिटर आणि कंटेंट स्पेशलिस्ट डॉ. स्वाती मिश्रा (Dr. Swati Mishra) यांनी वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती याच्या काही टीप्स दिल्या आहेत. 


वजन कमी करण्याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे हा डायटिंगचा भाग नाहीये तर हा तुमच्या बदलत्या जीवनाचा एक भाग आहे. यामध्ये लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही कोणत्याही काल्पनिक संकल्पनांवर विश्वास न ठेवता फक्त सत्यावर विश्वास ठेवणे. वजन कमी करताना तुमचं मोटीव्हेशन कोणतंही असू शकतं. 


वजन कमी करण्याबाबत काही सामान्य प्रश्न.


1. जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का?


संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, जेवणाच्या 30 मिनिटांआधी 500ml पाणी प्यायल्यास नक्कीच तुमचे वजन कमी करण्यास फायदा होऊ शकतो. ही पद्धत फक्त तुमचे आरोग्य निरोगी ठेवण्यास उपयोगी पडू शकते. 


टीप : जर तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार असेल तर तुम्ही हा सल्ला फॉलो करू नका. 


2. कमी प्रमाणात मात्र जास्त पदार्थ एकाच वेळी खाल्ल्यास फायदा होतो का?


एकाच वेळी जास्त प्रणात अन्न खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होतो. त्यापेक्षा तुम्ही कमी प्रमाणात योग्य अन्न खाल्ल्यास यामुळे तुमचे आरोग्यही निरोगी राहते. 


टीप : डाएट हे व्यक्तिश: आधारलेले आहे. काहींना डाएटिंग सूट होते काहींना नाही.


3. रात्री जेवणाची योग्य वेळ कोणती?


अधिकतर तज्ज्ञ म्हणतात, सूर्यास्ताच्या आधी जेवण करण्याची योग्य वेळ आहे. विशेषत: जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी किमान सूर्यास्ताआधी जेवण करावे. जेवण आणि झोपेच्या मधल्या वेळेत जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही हेल्दी पदार्थ (स्नॅक्स) खाऊ शकता. 


टीप : बाहेरचं जंक फूड खाण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने हेल्दी पदार्थ खा. 


4. ग्रीन टी खरंच वजन कमी करण्यास फायदेशीर आहे का?


काही अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की, ग्रीन टी वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. कमी कॅलरी असलेले पेय प्यायल्याने बायोक्टिव्ह संयुगे जसे की, कॅफेन. यामुळे तुमचे मेटाबॉलिझम वाढणे आणि चरबी कमी करण्यास मदत होते.   


टीप : ग्रीन टी ही अधिकतच तुमची त्वचा आणि निरोगी हृदयासाठी अधिक फायदेशीर मानली जाते. 


5. वजन कमी करण्यासाठी कोणती फळं फायदेशीर आहेत?


प्रक्रिया न केलेले, कमी ऊर्जा देणारे यांसारखी फळं खाऊ नयेत. याशिवाय जास्त प्रोटीन, फायबर आणि जास्त ऊर्जा देणारी फळं खावीत. यामध्ये ड्रायफ्रूट्स जसे की, अक्रोड, बदाम, दही, कमी कॅलरी देणारी फळं जसे की, सफरचंद, संत्र, द्राक्षे यांचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. 


6. अधून मधून उपवास केल्याने त्याचा वजन कमी करण्यावर कितपत परिणाम होतो?


हे तुमच्या अधूनमधून उपवास खाण्यासाठी आणि उपवास करण्यासाठी नियमित कालावधी निवडण्यावर आधारित आहे. ठराविक काळानंतर अन्न न खाल्ल्यास शरीरात थकवा जाणवतो. 


टीप : यासाठी तुम्ही न्यूट्रिशिनिस्टशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्या. 


महत्वाच्या बातम्या :