5th September 2022 Important Events : विविध सणवारांचा ऑगस्ट महिना संपून आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 5 सप्टेंबरचे दिनविशेष.


1 ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week)


भारतीय जनतेमध्ये पोषण आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह पाळला जातो. लोकांना पौष्टिक आणि अनुकूल खाण्याच्या सवयींचे महत्त्व समजावे यासाठी हा आठवडा पाळला जातो.


5 सप्टेंबर - शिक्षक दिन 


आजचे विद्यार्थी हे उद्याच्या जगाचे भविष्य आहेत आणि या भविष्याला घडविण्याचे काम हे शिक्षक करतात. मनुष्याच्या आयुष्यातील शिक्षकाचे स्थान लक्षात घेऊन जगभरात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या गुरूंसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. 


5 सप्टेंबर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन (Dr. Radhakrishnan’s birthday)


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूपाणी या गावी झाला. त्यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्ष शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला. त्यांच्याच स्मरणार्थ 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.


5 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस (International Day of Charity)


दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस' साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवसाचे उद्दिष्ट जास्तीत जास्त गरजू लोकांना जागरूक करून त्यांना मदत करणे आणि त्यांना दान करण्यासाठी प्रोत्साहित करणे असा आहे.


1918 : उद्योगपती रतनजी जमशेदजी टाटा यांचे निधन.


जमशेदजी नसरवानजी टाटा पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा उद्योगसमूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.


1977 : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने बाह्य सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी व्हॉएजर 1 या उपग्रहाचे पृथ्वीवरून उड्डाण केले.


1933 : आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘रॅमन मॅग्सेसे पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी सेवानिवृत्त प्रमुख अधिकारी आणि लोकपाल लक्ष्मीनारायण रामदास यांचा जन्मदिन.


1997 : समाजसेविका मदर टेरेसा यांचे निधन.


मदर टेरेसा ह्या एक समाजसेविका होत्या. त्यांनी त्यांच्या काळात कुष्ठरोग रुग्णालये अनाथालय महिला अपंग वृद्धांची आश्रम ग्रुप हे फिरते दवाखाने इत्यादी प्रकारच्या शाळा,संस्था उभ्या केल्या. त्यांनी समाजसेवेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार तसेच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


2005 : इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ‘फ्लाईट 091’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील 104 आणि जमिनीवरील 39 लोक ठार झाले.