5th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 5 जुलैचे दिनविशेष.


1996 : संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर


1913 : किर्लोस्कर नाटक मंडळीतील प्रमुख नट गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या भागीदारीत बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली.
सन 1913 साली महाराष्ट्रीयन मराठी नाटक मंडळी किर्लोस्कर नाटक मंडळाचे प्रमुख नायक गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्या सहकार्याने बालगंधर्वांनी ‘गंधर्व नाटक मंडळाची’ स्थापना केली.


1975 : देवी या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.


1998 : साली तामिळनाडू राज्यात डॉल्फिन सिटीचे उद्घाटन करण्यात आले.


1918 : साली प्रख्यात भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य तसचं, केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरण यांचा जन्मदिन.


1946 : साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यिक विद्वान, कादंबरीकार, नाटककार आणि लेखक असगर वजाहत यांचा जन्मदिन.


1995 : साली पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधु उर्फ पी. वी. सिंधु यांचा जन्मदिन.


1957 : साली भारतीय राष्ट्रवादी राजकारणी, महात्मा गांधी यांच्या गांधीवादी चंपारण्य सत्याग्रहाचे सदस्य व आधुनिक बिहार राज्याचे रचनाकार तसचं,  बिहार राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री डॉ. अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :